पुणतांबा येथील बंधार्‍याच्या पाणी पातळीत लक्षणीय घट

पुणतांबा येथील बंधार्‍याच्या पाणी पातळीत लक्षणीय घट

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

येथील गोदावरी नदीवर बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या वसंत बंधार्‍याच्या पाण्याच्या पातळीत कडक उन्हाळ्यामुळे वेगाने घट होत आहे.

बंधार्‍याच्या भिंतीजवळ अनेक ठिकाणी तळ उघडा पडला आहे. तसेच बंधार्‍यातील अनेक खडक सुद्धा उघडे पडले आहे. असे असले नदीकाठच्या भागातील विहीरीच्या पाण्याची पातळी अद्यापही टिकून आहे.

बोरबन भागातही नदीपात्रात पाण्याची पातळी इतर भागाच्या तुलनेने फारशी कमी झालेली नाही. दरवर्षीच्या तुलनेने या बंधार्‍यात मार्च महिन्यापर्यंत पाणी टिकून राहिल्यामुळे पुणतांब्यासह नदी काठच्या गावात अद्यापही पाणी टंचाई जाणवत नाही. परिसरातील गणेश बंधारे, गावतळी कोरडे पडले आहेत. येथील डेरा नाला भागात बांधलेल्या सिमेंट बंधारे 10 दिवसापूर्वीच कोरडे झाले आहेत. कडक उन्हाळ्यामुळे वाड्या वस्तत्यावरील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वेगाने घट होत आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परिसरात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com