पुणतांबा परिसरातील बंधारे भरून न दिल्यास शिवसेनेचे धडक आंदोलन - सुहास वहाडणे

पुणतांबा परिसरातील बंधारे भरून न दिल्यास शिवसेनेचे धडक आंदोलन - सुहास वहाडणे

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

गोदावरी उजव्या कालव्याला सोडण्यात आलेले ओव्हर फ्लोच्या पाण्यातून पुणतांबा परिसरातील गणेश बंधारे, सिमेंट बंधारे, गावतळी, एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास योजने अंतर्गत तयार केलेल्या बंधारे तातडीने भरून घ्यावेत अन्यथा शिवसेनेच्या वतीने पाटबांधारे खात्याच्या राहाता कार्यालया समोर धडक आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुहास वहाडणे यांनी दिला आहे.

वहाडणे म्हणाले, परिसरात आतापर्यंत सरासरी 7 इंच पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे अद्यापही विहीरींच्या पाण्याच्या पातळीत काहीही वाढ झालेली नाही. गोदावरी नदीवरील वंसत बंधारा वगळता सर्व बंधारे अद्यापही कोरडे आहेत. त्यातच पावसाने उघडीप दिलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पाऊस सुरू असल्यामुळे गोदावरी उजव्या व डाव्या कालव्यांना ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्यात आलेले आहे. कालव्यांना पूर्ण क्षमतेने पाणी सोडले तर परिसरातील बंधार्‍यामध्ये पाणी सोडणे शक्य होणार आहे.

सध्या शेतकंर्‍या कडून 7 नंबरचे फॉर्म भरून घेण्याची मोहीम सुरू आहे. त्यामुळे 7 नंबर फॉर्ममार्फत खरीप पिकांना पाटपाणी मिळणे सोयीस्कर होणार आहे. त्यासाठी पाटबंधारे खात्याकडून स्वंतत्र रोटेशन सोडले जाण्याची शक्यता आहे. मात्र सध्या कालव्यांना ओव्हर फ्लोचेे पाणी सुरु आहे. त्याचा अंतर्भाव रोटेशनमध्ये करू नये. तसे झाल्यास बंधार्‍यामध्ये पाणी सोडण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.

पुणतांबा व परिसरातील 11 गावातील पाटपाण्याबाबद पाटबांधारे खात्याकडून नेहमीच पक्षपात केला जातो. पाट पाण्याच्या प्रश्नात लोक प्रतिनिधी गांभीर्याने लक्ष घालत नाही. त्यामुळे पुणतांबा परिसराचे वाळवंट होणार की काय? अशी भिती शेतकरी वर्गात निर्माण झालेली आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचेही श्री. वहाडणे यांनी स्पष्ट केले आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com