पुणतांबा येथे गुन्हेगारांचे प्रस्थ वाढले

पोलिसांनी कडक कार्यवाही करण्याची मागणी
पुणतांबा येथे गुन्हेगारांचे प्रस्थ वाढले

पुणताबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा परिसरात विविध गुन्हेगारीचे प्रस्थ वाढत असून अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. गावात कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या निर्माण झाली आहे.

पोलीस प्रशासनाने कडक कार्यवाही करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

राहाता तालुका पोलीस स्टेशनच्या पुणतांबा औट पोस्ट अंतर्गत पुणतांबा, रस्तापूर, शिंगवे, रामपूर ही गावे आहेत. नेमणुकीस एक हेड कॉन्स्टेबल असून त्यांनाही राहाता तालुका पोलीस स्टेशनला काही दिवस जबाबदारी दिली जाते. या गावात अचानक काही घटना घडली तर तात्काळ पोलिसांना पोहचण्यास वेळ लागतो.

राहाता तालुका पोलीस स्टेशनशी संपर्क करून पोलिसांना खबर दिली जाते. या माहितीनुसार पुढील कार्यवाही सुरू होते. यात बराच वेळ वाया गेल्याने घटना, गुन्हा घडून जातो त्याची तिव्रताही वाढली जाते. शिवाय यापूर्वी पुणतांबा परिसरात अनेक चोर्‍या झाल्या परंतु या चोर्‍याचा तपास अद्याप लागलेला नाही. अनेक हातावर भांडवल असणार्‍या किंवा कर्ज घेऊन भांडवल उभारणार्‍या व्यावसायिकांच्या व घरघुती चोर्‍या झाल्या.

आजपर्यंत कुठल्याही चोरीचा तपास लागला नाही उलट अवैध व्यवसाय करणारांची संख्या वाढत चालली आहे. याला कोण जबाबदार हे एक कोडेच आहे, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांची आहे. पुणतांबा पोलीस चौकीत पोलीस अनेक वेळा नसतात. गावात घडलेल्या गुन्ह्याची नोंद करण्यासाठी राहाता तालुका पोलिस स्टेशनला बोलावून घेतले जाते.

पोलीस कर्मचारीच वेळेवर उपलब्ध नसेल तर मग येथील पोलीस चौकीचा गावकर्‍यांना काय उपयोग आहे. आशी चर्चा नागरीकांत आहे. त्यामुळे पुणतांबा परिसरात विविध गुन्हेगारीचे प्रस्त वाढात असून अनेकांची कुंटुंब उध्वस्त झाली. गावात कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या निर्माण झाली यावर पोलीस यंत्रणेने डोळे झाक न करता गुन्हेगारांना वेळीच पायबंद घातला तर यात सुधारणा होईल. यासाठी पोलीस प्रशासनाने कडक कार्यवाही करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करित आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com