अवैध धंद्यांनी जम बसविल्यामुळे पुणतांब्यात वाढली गुंडगिरी

अवैध धंद्यांनी जम बसविल्यामुळे पुणतांब्यात वाढली गुंडगिरी

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

गावात व परिसरात सर्वच प्रकारच्या अवैध धंद्यानी चांगलाच जम बसविल्यामुळे गावात दिवसेंदिवस गुंडगिरी वाढत असल्यामुळे ग्रामस्थामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष सध्या येथील गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळूचा उपसा होत आहे. या व्यवसायात पुणतांब्यातील अनेक जण उतरले आहेत. बेकायदा वाळूचा उपसा व वाहतूक यांच्याकडे येथील महसूलचे अधिकारी व पोलीस यंत्रणा कारवाई करत नाही. तसेच ग्रामपंचायत प्रशासनही बघ्याची भूमिका घेते. याबद्दल ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बेकायदा वाळू उपशा बरोबर गावात मटका, जुगार अड्डे, हातभट्टीच्या तसेच बेकायदा विदेशी दारूची विक्री सारखे अवैध धंदे जोमाने सुरू आहे.

त्यामुळे गावात गुंडगिरी वाढली आहे. यामुळे अवैध धंदे चालकाकडून ग्रामस्थांना धमक्या देण्याचे प्रकार वाढले आहे. बहुतांशी अवैध धंदे चालकांचे राजकीय नेत्यांशी लागबांधे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. तसेच पोलिसांकडून बघ्याची भूमिका घेतली जाते. अगोदरच पुणतांबा पोलीस स्टेशनला पोलिसांची संख्या कमी आहे. त्यामुळे अवैध व्यावसायिकांना व्यवसायासाठी आपोआपच संधी मिळत नाही. गावातील सर्वच प्रकारचे अवैध धंदे तातडीने बंद करण्याची ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com