पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

गावात व परिसरात वाढत चाललेल्या करोनाच्या संसर्गावर नियत्रंण करण्यासाठी पुणतांबा येथील ग्रामपंचायत प्रशासन व करोना समिती सतर्क झाली आहे.

करोनाचा संसर्ग वाढल्याचे वृत दैनिक सार्वमतमध्ये प्रसिद्ध होताच येथील करोना समितीचे अध्यक्ष डॉ. धनजंय धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. त्यात पुणतांबा येथील व्यावसायिक दुकाने सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याच्या निर्णय झाला. त्याचबरोबर करोनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचे व नियमाचे उल्लंघन करणारावर दंडात्मक कारवाई करण्याचे ठरविण्यात आले.

काल सकाळी 11 वाजता राहात्याच्या पोलीस अधिकार्यांनी पुणतांबा येथे येऊन मास्क न घालता फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच येथील सामाजिक कार्यकर्ते प्रताप वहाडणे यांनी हातात फलक घेऊन करोनाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती अभियान सुरु केले आहे. त्याचबरोबर येथील ग्रामीण रुग्णालयातही वैद्यकीय अधिकारी व त्यांचा स्टाफ करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सक्रिय झाले आहेत.