पंजाबराव देशमुख योजनेतील दोन वर्षांचे व्याज परतावे अद्याप नाहीत

पंजाबराव देशमुख योजनेतील दोन वर्षांचे व्याज परतावे अद्याप नाहीत

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राज्य शासनाने पंजाबराव देशमुख व्याज सवलतीच्या योजनेचा विस्तार एक लाखावरून तीन लाखापर्यंतच्या कर्जासाठी केला आहे. मात्र लाखांपर्यंतच्या कर्जाला शून्य टक्के व्याजदराची सवलत असुनही या योजनेतील दोन वर्षाच्या व्याजाचे परतावे शेतकर्‍यांना अद्याप मिळालेले नाहीत.

सेवा सोसायट्या, सहकारी बँकांनी मात्र शेतकर्‍यांकडून या व्याजाची वसुली केली असून शासनाकडून व्याज आल्यावर शेतकर्‍यांना परत देण्याचे सांगितले जात आहे. नियमीत परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना एक लाखापर्यतच्या पीक कर्जावर आकारले जाणारे सहा टक्के व्याज सरकारकडून प्रोत्साहन म्हणून परत दिले जात होते. यामध्ये राज्य सरकार पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून तीन टक्के तर केंद्र तीन टक्के व्याजाचा परतावा देत होते.

राज्य सरकारने या व्याज मुक्त एक लाखांच्या पीक कर्जाची मुदत तीन लाखांपर्यंत केली आहे. या निर्णयामुळे नियमीत कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना मोठा आधार मिळणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com