पंजाबराव देशमुख व्याज परताव्यापोटी राहाता तालुक्याला 40.36 लाख मंजूर

पंजाबराव देशमुख व्याज परताव्यापोटी राहाता तालुक्याला 40.36 लाख मंजूर

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) 2019-20 वर्षामध्ये नियमीत पीक कर्जाची परतफेड (Crop Loan Repayment) करणार्‍या शेतकर्‍यांना पंजाबराव देखमुख व्याज सवलत योजनेतून (Punjabrao Dekhmukh Interest Concession Scheme) 40 लाख 36 हजार 734 रूपयांचा परतावा मंजूर झाला असून मार्च अखेर पात्र शेतकर्‍यांच्या (Farmer) खात्यावर या रकमा जमा होणार असल्याची माहिती राहाता तालुका सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी दिली.

नियमीत पीक कर्ज भरणार्‍या (Regular Crop Loan Payers) शेतकर्‍यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने सरकार तीन लाखांपर्यंतच्या पीक कर्जावरील (Crops Loan) सहा टक्के व्याज पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने (Punjabrao Deshmukh Interest Concession Scheme) अंतर्गत शेतकर्‍यांना परत देते. मात्र करोना संकटामुळे गेल्या दोन वर्षापासुन नियमीत व्याजासह पीक कर्ज (Crops Loan) भरणार्‍या शेतकर्‍यांचे व्याज परतावे देण्यात आलेले नव्हते. शेतकर्‍यांना मात्र करोना संकट, नैसर्गिक आपत्ती असतानाही पोटाला चिमटा घेवून आपल्याकडील पीक कर्ज व्याजासह वेळेत भरली होती. त्यामुळे रखडलेले व्याज परतावे मिळावेत, अशी मागणी शेतकर्‍यांमधुन होत होती.

अखेर शासनाकडून राहाता तालुक्यातील शेतकर्‍यांना सन 2019-20 या वर्षामधील व्याज परतावा मंजूर झाला आहे. तालुक्यातील 73 सेवा सोसायट्यांच्या 2 हजार 784 नियमित पीक कर्जाची परतफेड करणार्‍या सभासदांसाठी 40 लाख 36 हजार 734 रूपये मंजूर झाल्याची माहिती तालुका सहा. निबंधक रावसाहेब खेडकर यांनी दिली आहे. त्यामुळे नियमीत पीक कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com