ऑगस्टच्या मध्यावर मुळा धरण भरणार - पंजाब डख

ऑगस्टच्या मध्यावर मुळा धरण भरणार - पंजाब डख

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनई व परिसरात येत्या 4 ऑगस्ट नंतर मुसळधार पाऊस पडणार असून पुढील महिन्यात होणार्‍या पावसामुळे शेतकर्‍यांची जीवनदायीनी म्हणवणारे मुळा धरण भरणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.

नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा बाजारच्या वतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख यावेळी उपस्थित होते.

पंजाबराव डख पुढे म्हणाले, सोनई व परिसरात येत्या 4 ऑगस्ट नंतर मुसळधार पाऊस पडणार आहे, पुढील महिन्यात होणार्‍या पावसामुळे शेतकर्‍यांची जीवनदायी म्हणवणारे मुळा धरण भरणार आहे. पंजाबराव डख यांनी मुळा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाची व कारखाना कार्यस्थळाची पाहणी केली. मुळा सहकारी साखर कारखाना राज्यातील एक उत्कृष्ट कारखाना आहे तसेच परिसरातील वृक्ष संवर्धनचे कौतुक डख यांनी केले.

उदयन गडाख यांनीगेल्या पंचवीस वर्षांमध्ये मुळा बाजारने सोनई व नेवासा परिसरातील नागरिक शेतकरी यांना कश्या प्रकारे सहकार्य केले याविषयी माहिती दिली.

याप्रसंगी पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी मनोगत व्यक्त केले . प्रास्ताविक हेमंत दरंदले यांनी केले. याप्रसंगी ज्येेष्ठ नेते विश्वासराव गडाख, भाऊसाहेब मोटे, बाळासाहेब गोरे रामदास घुले, पंचायत समिती उपसभापती किशोर जोजार, बाबुराव चौधरी, अनिल अडसुरे, तुकाराम शेंडे,नारायण लोखंडे, लक्ष्मणराव जगताप, योगेश होंडे, संजय जंगले, रंगनाथ जंगले, दादासाहेब शेळके, बाळासाहेब पाटील, कैलास झगरे, सीताराम जाधव,मदनराव डोळे, उदय पालवे, बाळासाहेब सोनवणे, दिलीप शेलार, धनंजय वाघ, निसार सय्यद, आण्णासाहेब ढेरे, भास्करराव जाधव आदींसह सोनई व नेवासा परिसरातील शेतकरी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com