अर्ध्यावर सुटली साथ विठ्ठला! श्रीगोंदा येथील वारकऱ्याचा अपघातात जागीच मृत्यू

अर्ध्यावर सुटली साथ विठ्ठला! श्रीगोंदा येथील वारकऱ्याचा अपघातात जागीच मृत्यू

श्रीगोंदा | प्रतिनिधी

पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला श्रीगोंदा येथून पायी वारीत निघालेल्या वारकऱ्याला पुणे सोलापूर महामार्गावर मदनवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत सकुंडे वस्ती येथे एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मण मार्तंड रोडे (वय ७५ व रा. घुटेवाडी ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर) असे या वारकऱ्याचे नाव आहे. याबाबत भिगवण पोलिस ठाण्यामध्ये लक्ष्मण रोडे यांचे जावई कल्याण गुलाब घुटे यांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

अर्ध्यावर सुटली साथ विठ्ठला! श्रीगोंदा येथील वारकऱ्याचा अपघातात जागीच मृत्यू
Video : ...अन् बिबट्याला लोकांनी खायला दिल्या चक्क 'चपात्या'; प्रकरण पोहोचलं पोलिस ठाण्यात, नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा येथील दिंडी बुधवारी रात्रीपासून मधून वाडी ग्रामपंचायत हद्दीतील सकुंडे वस्ती जवळ मुक्कामी होते. बुधवारी सकाळी दिंडीतील सदस्य असलेले लक्ष्मण रोडे हे पहाटे प्रात:विधीसाठी रस्ता ओलांडत होते. यावेळी सोलापूर बाजू कडून पुण्याला जाणाऱ्या एका वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात रोडे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला.

अर्ध्यावर सुटली साथ विठ्ठला! श्रीगोंदा येथील वारकऱ्याचा अपघातात जागीच मृत्यू
मित्राच्या लग्नाला जाताना काळाची झडप; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, एक जखमी
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com