सिमेंट ब्लॉक घेऊन जाणारा ट्रक महामार्गावर पलटी !

एकजण जखमी, महामार्गावर सर्वत्र सिमेंट ब्लॉक
सिमेंट ब्लॉक घेऊन जाणारा ट्रक महामार्गावर पलटी !

घारगाव |वार्ताहार| Ghargav

सिमेंट ब्लॉक घेऊन जाणारा मालवाहू ट्रक हा थेट महामार्गावर पलटी झाल्याने महामार्गावर सर्वत्र सिमेंट ब्लॉक मोठ्याप्रमाणात पडले होते. तर यामध्ये एकजण जखमी झाला आहे. ही अपघाताची घटना रविवार (दि.20 नोव्हेंबर) रोजी सकाळी सव्वा आकरा वाजेच्या दरम्यान पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील (एकल घाट ता.संगमनेर) येथे घडली आहे.

सिमेंट ब्लॉक घेऊन जाणारा ट्रक महामार्गावर पलटी !
कापूस, कांदा व सोयाबीनचे दर कमी झाल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ

याबाबत डोळासणे महामार्ग पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मालवाहू ट्रक हा सिमेंट ब्लॉक घेऊन संगमनेरकडून पुणेच्या दिशेने जात असताना ट्रक रविवारी सकाळी वरची माहुली येथील एकल घाटाच्या पहील्या वळणावर आला असता त्याच दरम्यान ट्रक थेट महामार्गावर पलटी झाला. त्यामुळे ट्रकमधील सिमेंट ब्लॉक महामार्गावर पडले होते. या घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्गाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मनिष शिंदे, सुनिल साळवे, नंदकुमार बर्डै, योगीराज सोनवणे, अरविंद गिरी त्याच बरोबर घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक गणेश लोंढे, हरिश्चंद्र बांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सिमेंट ब्लॉक घेऊन जाणारा ट्रक महामार्गावर पलटी !
नगर भविष्यातील लॉजिस्टीक कॅपीटल

त्यानंतर जखमीस रुग्णवाहिकेतून औषधोपचारासाठी घारगाव येथे पाठवले होते. मालवाहू ट्रक पलटी झाल्याने ट्रकसह सिमेंट ब्लॉकचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रक पलटी झाल्याचे समजताच हिवरगाव पावसा टोलनाक्याच्या कर्मचार्‍यांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. मोठ्याप्रमाणात सिमेंट ब्लॉक हे महामार्गावर पडल्याने वाहतूकीसाठीही अडथळा निर्माण झाला होता.

सिमेंट ब्लॉक घेऊन जाणारा ट्रक महामार्गावर पलटी !
गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांनी घाबरू नये

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com