पिकअपची कंटेनरला पाठीमागून धडक; एक ठार

पिकअपची कंटेनरला पाठीमागून धडक; एक ठार

घारगाव | Ghargav

संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे शिवारात मालवाहतूक पिकअपने रोडवर नादुरुस्त असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात पिकअप चालक जागीच ठार झाला. ही अपघाताची घटना मंगळवारी (ता.25) एप्रिल रोजी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रोशन संतोष पवार (वय 20, रा. दत्तनगर,मु.पोस्ट ओझर, ता.निफाड जि. नाशिक) हा पिकअपमधून (क्र. एमएच. 15, एचएच. 9298) हीच्यामधून जांभळं घेऊन नाशिककडून संगमनेर मार्गे पुणेच्या दिशेने जात होता मंगळवारी पहाटे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे शिवारात आला असता त्याच दरम्यान पुढे एका हॉटेल समोर रोडवर नादुरुस्त असलेल्या कंटेनर (क्र.आरजे.32, जीसी.6726) याला पाठीमागून जोरात धडकला.त्यामुळे पिकअप चालक हा आतमध्ये अडकला होता. सदर अपघात झाल्याचे समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

माहिती समजताच घारगाव पोलिसांसह डोळासणे महामार्गाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पंढरीनाथ पुजारी यांनीही घटनास्थळी धाव घेतली. मात्र पिकअप चालक रोशन पवार याचा जागीच मृत्यू झालेला होता. हा अपघात इतका भीषण होता की पिकअपचा पुढील बाजूचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. क्रेनच्या साहाय्याने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्यात आली. तर पिकअपमधील जांभळांचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी गणेश राजेंद्र बत्तासे (रा.पंचवटी, फुलेनगर विजय चौक,गणपती मंदिराजवळ घर नं.एल 9, नाशिक) यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सहायक फौजदार सुरेश टकले हे करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com