कारच्या धडकेत दोघे गंभीर जखमी

कारच्या धडकेत दोघे गंभीर जखमी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

पुणे -नाशिक हायवेवर (Pune Nashik Highway) भरधाव वेगाने जाणार्‍या कारने मोटारसायकलला धडक (Car Bike Accident) दिल्याने दोघे जण गंभीर जखमी (Injured) झाल्याची घटना रायतेवाडी फाटा परिसरात घडली.

या घटनेत संपत तबाजी राहणे (वय 46) व दादा मार्तंड राहणे (वय 65, दोघे राहणार चंदनापुरी) हे जखमी (Injured) झाले आहेत. चंदनापुरी (Chandanapuri) येथील मुळगंगा दूध डेअरी मध्ये दूध टाकून मोटरसायकलने संगमनेरकडे रस्ता ओलांडून जात असताना नाशिक-पुणे महामार्गावरील (Nashik Pune Highway) रायतेवाडी फाटा परिसरात एम. एच. 14 जीएस 5676 या क्रमांकाच्या कारने त्यांना धडक दिली.

या अपघातात ते गंभीर जखमी (Injured) झाले. त्यांना तातडीने शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार साठी हलविण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com