कारच्या धडकेत किर्तनकार जागीच ठार !

कुठे झाला अपघात
कारच्या धडकेत किर्तनकार जागीच ठार !

घारगाव |वार्ताहार| Ghargav

संगमनेर तालुक्यातून (Sangamner Taluka) जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील (Pune Nashik Highway) वरची माहुली (Mahuli) येथील घाटात कारच्या धडकेत (Car Accident) दुचाकी चालवणारे किर्तनकार महाराज ठार (Death) झाले आहे. ही अपघाताची (Accident) घटना मंगळवार ता.28 फेब्रुवारी रोजी दुपारी घडली आहे. तुकाराम काशिनाथ जाधव (वय 54 रा. समशेरपुर ता. अकोले) असे अपघातात (Accident) ठार झालेल्या महाराजांचे नाव आहे.

कारच्या धडकेत किर्तनकार जागीच ठार !
अकोले : अबालवृध्दांच तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

याबाबत घारगाव पोलिसांनी (Ghargav Police) दिलेली माहिती अशी की, हभप तुकाराम काशिनाथ जाधव हे महाराज (एमएच 17 सी.डी 2623) या दुचाकीवरून आळंदी (Alandi) येथून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने (Pune Nashik Highway) आपल्या समशेरपुर गावी जात होते. मंगळवारी दुपारी माहुली घाटात (Mahuli Ghat) आले असता त्याच दरम्यान (एमएच 17 सी.पी 1020) या कारवरील अनोळखी चालकाने कार (Car) भरधाव वेगाने चालवून त्यांच्या दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात तुकाराम जाधव हे जागीच ठार (Death) झाले. हा अपघात झाल्याचे समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

कारच्या धडकेत किर्तनकार जागीच ठार !
महाराष्ट्रातील अडीच हजार महिलांना फसवून ओमान, दुबईत नेले

त्यानंतर अपघाताची माहिती डोळासणे महामार्ग पोलिसांना देण्यात आली होती. माहिती समजताच सहायक पोलिस निरीक्षक सचिन सुर्यवंशी यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी शरद जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी (Ghargav Police) अनोळखी कारचालका विरूद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 99 /2023 भादवि कलम304(अ), 279, 427 मोटार वाहक कायदा कलम 134(अ)( ब)/ 177 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आदिनाथ गांधले हे करत आहे.

कारच्या धडकेत किर्तनकार जागीच ठार !
पोलीस अधिकार्‍याची महिलेला भररस्त्यात मारहाण
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com