वाहनाच्या धडकेत दोन ठार तर एक गंभीर जखमी

पुणे-नाशिक महामार्गावरील वरूडी फाटा येथील घटना
वाहनाच्या धडकेत दोन ठार तर एक गंभीर जखमी
अपघात | Accident

घारगाव |वार्ताहर| Ghargav

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Nashik Highway) वरूडी फाट्या (Varudi Phata) पासून काही अंतरावर अज्ञात वाहनाच्या धडकेत (Accident) दुचाकीवरील दोन जण जागीच ठार (Death) तर एक जण गंभीर जखमी (Injured) झाल्याची घटना मंगळवार (२३ नोव्हेंबर) दुपारी घडली आहे. हा अपघात (Accident) इतका भयानक होता की महामार्गावर मोठ्याप्रमाणात रक्त सांडले होते. याबाबत डोळासणे महामार्ग पोलीसांनी (Highway Police) दिलेली माहिती अशी की, मंगळवारी पापा अब्दुलकरीम मनियार, अन्सार अब्दुलकरीम मनियार व त्यांचा जोडीदार नाव समजू शकले नाही असे तिघे जण दुचाकीवरून संगमनेरकडे (Sangamner) येत होते.

दुपारी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Nashik Highway) वरूडी फाट्यापासून (Varudi Phata) काही अंतरावर गेले असता त्या वेळी अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली त्यामुळे झालेल्या भिषण अपघातात (Accident) पापा अब्दुलकरीम मनियार व अन्सार अब्दुलकरीम मनियार (दोघे राहणार तळेगाव दिघे) हे जागीच ठार (Death) झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भिषण होता की महामार्गावर मोठ्याप्रमाणात रक्त (Blood) पडले होते. यावेळी घटनास्थळी आजू बाजूच्या नागरिकांसह वाहन चालकांनीही मोठी गर्दी (Crowd) केली होती.

तर घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस योगीराज सोणवने, नंदकुमार बर्डै यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान गेल्या चार ते पाच दिवसांन पासून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com