पुण्याच्या व्यावसायिकाची तीन कोटींची फसवणूक

पाच जणांविरुद्ध गुन्हा || दोघे नगर जिल्ह्यातील
पुण्याच्या व्यावसायिकाची तीन कोटींची फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरच्या रेडीमिन्टस कन्सल्टन्सी कंपनीमार्फत शेअर्समध्ये व अभिरचना इंजिनिअरिंग कंपनीमध्ये पुण्याच्या व्यावसायिकाने सुमारे तीन कोटी रूपयांची गुंतवणूक केली. मात्र, कालांतराने डिमॅट खात्यात चक्क झिरो बॅलन्स आढळल्याने या व्यावसायिकाला धक्काच बसला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नगर, नाशिक व मुंबईच्या दोघांसह पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याच्या व्यावसायिकाची तीन कोटींची फसवणूक
हजाराच्या लाचेसाठी जीएसटी अधिक्षकासह निरीक्षकही जेरबंद

व्यावसायिक गणेश परसराम कदम (वय 33, गंगा आर्केडीया, खराडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैभव अंनत चेमटे (रा. भाळवणी ता. पारनेर), किशोर शिवाजीराव पठारे (रा. केडगाव, नगर), केदार सदाशिव ओटी (रा. नाशिक), महेश पाटील व प्रशांत ढेपे (दोघे रा. मोतीलाल ओसवाल कंपनी, मुंबई) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याच्या व्यावसायिकाची तीन कोटींची फसवणूक
जलजीवनमध्ये जिल्ह्यात 825 नळ पाणी योजनांना मंजुरी

कदम यांनी सन 2018 पासून बुरूडगाव रस्त्यावरील रेडीमिन्टस कन्सल्टन्सी कंपनीमार्फत शेअर्समध्ये व अभिरचना इंजिनिअरिंग कंपनीमध्ये गुंतवणूक केली. या गुंतवणुकीपोटी त्यांना काही महिने 4 टक्के परतावा देण्यात आला. त्यानंतर तो देणेही बंद केले. तसेच डिमॅट खात्यात झिरो बॅलन्स दाखविण्यात आला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कदम यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज दाखल केला होता.

पुण्याच्या व्यावसायिकाची तीन कोटींची फसवणूक
कमी भावात मातीचे भांडे देण्याचे आमिष; व्यावसायिकाची फसवणूक

या अर्जाची तपासणी झाल्यानंतर कदम यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तीन कोटी दोन लाख 59 हजार हजार रूपयांची संगनमताने फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करत आहेत.

पुण्याच्या व्यावसायिकाची तीन कोटींची फसवणूक
खळबळजनक! प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com