पुणतांबा (वार्ताहर) -

येथील रेल्वे स्टेशन रोडवर असलेल्या रेल्वे फाटकाच्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण

वाढल्यामुळे पुणतांबा मार्गे श्रीरामपूर व कोपरगावकडे जाणार्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.

प्रवाशांबरोबरच रेल्वे फाटकाच्या पूर्वेला शेती असलेल्या शेतकरी वर्गाला सुध्दा शेतीची कामे करण्यासाठी सातत्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गही त्रस्त झाला असून रेल्वे खात्याने तातडीने भुयारी पुलाचे काम सुरू करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूला रस्ता अरूंद झाला आहे.

सार्वजानिक बांधकाम खाते कोपरगाव, श्रीरामपूर तसेच ग्रामपंचायत प्रशासन पुणतांबा तसेच पोलीस स्टेशन पुणतांबा या प्रश्नाकडे कधी गांभीर्याने पाहणार आहे की नाही याबाबत ग्रामस्थांमध्ये साशंकता आहे. अपघात झाल्यावर यंत्रणा जागी होणार का? अशी चर्चा आहे. चांगदेवनगर येथील रेल्वे फाटकाजवळ दोन दिवसांत भुयारी पुलाचे काम सुरु होणार असून त्यासाठी आवश्यक साधनसामुग्री दोन दिवसांपूर्वी दाखल झाली आहे. या भुयारी पुलाचे काम पूर्ण झाल्यावर पुणतांबा येथील काम सुरू होण्याचे संकेत आहेत.