सार्वजनिक बांधकाम खात्याचा अजब प्रताप

प्रवरानगर रोडचे दोन रोडवर वेगवेगळे किलोमीटरचे दिशादर्शक
सार्वजनिक बांधकाम खात्याचा अजब प्रताप

बाभळेश्वर |वार्ताहर| Babhaleshwar

राहाता (Rahata) तालुक्यातील बाभळेश्वर-लोणी (Babhaleshwar-Loni) रोडवर साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर प्रवरानगर फाटा (Pravaranagar) आहे. राज्य महामार्ग 50 (दत्त मंदिर बाभळेश्वर) ते प्रवरानगर रोडचे मुख्यमंत्री ग्रामसडक येाजनेतून (CM Village Road Scheme) डांबरीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. कोणत्याही रोडचे नवीन डांबरीकरण झाल्यानंतर दिशादर्शक व किलोमीटरच्या अंतराच्या पाट्या लावाव्या लागतात. त्यानुसार राज्य महामार्ग 50 ते प्रवरानगर हे अंतर 2 किलोमीटर दाखविण्यात आले आहे.

तसेच राज्य महामार्ग 50 बाभळेश्वर-लोणी (Babhaleshwar-Loni) रोडवर दोन्ही डाव्या व उजव्या बाजुने गाव व किलोमीटरचे दिशादर्शक दाखविण्यात आले आहे. त्या दोन्ही बाजुने प्रवरानगर हे अंतर 5 किलोमीटर दाखविण्यात आले आहे. बाभळेश्वर रोडवरून जातांना प्रवरानगर 5 किलोमीटर दिसते व प्रवरानगर कडे वळतांता हेच अंतर 2 किलोमीटर दिसते. हिच अवस्था लोणी वरून प्रवरानगर कडे वळतांता दिसते. त्यामुळे लोणी-बाभळेश्वर रस्त्याने प्रवास करतांना प्रवासी व चालक यांच्यात दोन वेगवेगळ्या प्रवरानगरच्या दिशादर्शक फलकामुळे (Directional panel) संभ्रावस्था निर्माण होते.

या दोन्ही फलकामध्ये काही फुटाचे अंतर आहे. त्यामुळे नवीन फलक लावताना जुन्या फलकाकडे लक्ष का गेले नाही, असा प्रश्ऩ नागरीक करत आहे. कारण या ठिकाणी विखे साखर कारखाना (Vikhe sugar factory) व प्रवरा पब्लिक स्कूल (Pravara Public School) सारखी नामांकित शिक्षण संस्था आहे. त्यात प्रवरानगर (Pravaranagar) बाबतीत होने ही खेदाची बाब आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने (Public Works Department) लवकरात नेमके प्रवरानगर किती किलोमीटर आहे हे स्पष्ट करून योग्य किलोमीटरचा फलक लावावा. अशी मागणी दक्ष्य नागरिकांच्यावतीने करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com