नगर अग्नितांडव : नातेवाईकांचा ठिय्या, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

नगर अग्नितांडव : नातेवाईकांचा ठिय्या, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)-

अहमदनगर जिल्हा रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शनिवारी सकाळी लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी आहेत. या घटनेस जबाबदार असलेल्यांवर मनुष्यवधाना गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी रूग्णालय परिसरात ठिय्या दिला. यावेळी खा.डॉ.सुजय विखे पाटील, आ.संग्राम जगताप व माजी आ.शिवाजी कर्डिले यांनी नातेवाईकांशी चर्चा केली.

शनिवारी सकाळी लागलेल्या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे नगर जिल्हा हादरला आहे. या घटनेची राज्य शासनासह केंद्र सरकारकडूनही दखल घेण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे मृत व जखमी रूग्णांचे नातेवाईक संतप्त आहेत. घटनेनंतर त्यांनी एकच टाहो फोडला. जिल्हा रूग्णालयाच्या अनागोंदी कारभाराविरूद्ध जनक्षोभ उसळलेला असतानाच नातेवाईकांनी अचानक परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले. दोषींवर तातडीने मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी त्यांची मागणी आहे. तातडीने मदत जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com