जनता कर्फ्यू असतानाही सोनईत दुकाने उघडी

ग्रामसमिती व पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष
जनता कर्फ्यू असतानाही सोनईत दुकाने उघडी

सोनई |वार्ताहर| Sonai

करोना संसर्गाच्या (Corona contagion) पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हाधिकारी (Ahmednagar Collector) यांच्या आदेशाने जिल्ह्यात (Order District) सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत व शनिवार, रविवारी जनता कर्फ्यू जाहीर (Public curfew announced on Saturday, Sunday) असतानाही रविवारी सोनईत व्यापार्‍यांची दुकाने उघडी (Merchant shops open in Sonai) असल्याचे दिसून आले. असे असताना प्रशासनाकडून कुठलीही कारवाई (Administration No Action) होताना दिसली नाही.

बर्‍याच दिवसापासून बंद असलेले व्यवसाय, दुकानातील खर्च, कामगारांचे पगार हे प्रश्न छोट्या व्यापार्‍यांनाही असतात. तरीही शासनाच्या आदेशाचे पालन (Compliance with government orders) ते करतात मात्र मोठ्या व्यापार्‍यांनी करोना काळातही लपूनछपून आपले व्यवसाय चालू ठेवले होते व आताही दुपारी चार वाजेनंतर सर्वत्र बंद असतानाही मोठ्या व्यापार्‍यांचे व्यवसाय चालूच असतात. छोटे व्यापारी पोलिसांच्या भीतीने चार वाजता व्यवसाय बंद करतात पण मोठ्या व्यापार्‍यांवर पोलिसांकडून कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. शासनाचे निर्बंध फक्त छोट्या व्यापार्‍यांनाच आहेत काय? असा प्रश्न छोटे व्यापारी विचारत आहेत.

मागील वर्षी सोनई पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांचा धाक असल्याने त्या काळात ग्रामस्थ नियमांचे पालन करताना दिसत होते. सध्या करोना संपलाय का? अशी परिस्थिती असल्याचे जाणवते. मास्क वापर बंद झालेला दिसतो. जनता कर्फ्यूच्या दिवशी शनिवारी व रविवारी सोनईतील (sonai) अनेक भागांमध्ये दुकानाचे एक शटर उघडून व्यवसाय चालू असताना दिसत आहे. जनता कर्फ्यू (Public Curfew) असतानाही लोकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळाली. पोलिसांचा बंदोबस्त नसल्याने व काम नसतानाही अनेकजण विना मास्क फिरताना दिसत होते. सायंकाळी चारनंतर दुकान बंदचा आदेश असताना प्रत्यक्षात साडेपाच,सहा वाजेपर्यंत दुकाना उघड्या असतात. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. असे बोलले जात आहे .

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com