गॅस, डिझेल, पेट्रोल दरवाढी निषेधार्थ राहाता तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने

गॅस, डिझेल, पेट्रोल दरवाढी निषेधार्थ राहाता तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने

राहाता | वार्ताहर

केंद्रातील भाजपा सरकारने (BJP Govt) घरगुती वापराच्या गॅस, डिझेल, पेट्रोलच्या केलेल्या विक्रमी दरवाढी (Gas, diesel, petrol price hike) निषेधार्थ आज राहाता (Rahata) तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने व राहाता शहरअध्यक्ष नंदकुमार सदाफळ (Nandkumar Sadafhal) यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील मोदी प्रणीत भाजपा सरकारने पेट्रोल डिझेल व गॅसच्या किमतीत विक्रमी दरवाढ केलेली आहे. त्यामुळे देशातील सर्वसामान्य जनता या महागाईने होरपळलेली आहे. एकीकडे देशात सुमारे एक ते दीड वर्षापासून करोना (Corona) महामारीचे मोठे संकट कोसळलेली आहे त्यातच सर्वसामान्य जनतेचा रोजगार गेलेला आहे व जनतेच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. सर्वसामान्यांच आर्थिक बजेट सध्या कोलमडलेल्या आहे एकीकडे या भरमसाठ महागाईने (Inflation) डोके वर काढलेले असून त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे. महागाईमुळे सर्वत्र जनतेत चिंता वाढली आहे यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने त्वरित पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस व जीवन आवश्यक वस्तूंचे दरवाढ मागे घ्यावी व सर्व सामान्य जनतेचा विचार करून त्यांना दिलासा द्यावा. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस राहाता तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

त्याप्रसंगी गणेशचे माजी संचालक भगवानराव टिळेकर (Bhagwanrao Tillekar), राष्ट्रवादी युवक जिल्हा सरचिटणीस रणजीत बोठे (Ranjeet Bothe), महिला तालुकाअध्यक्षा सौ.अलका ताई कोते (Alkatai Kote), शहर सरचिटणीस शेखर जमधडे (Shekhar Jamdhde), ज्येष्ठ नेते अन्सार भाई दारुवाले ()Ansarbhai Daruwale), निळवंडे कृती समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे (dnyaneswar Varpe), राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मंगेश कुलकर्णी (Mangesh Kulkarni), योगेश निर्मळ (Yogesh Nirmal), अभिजीत बोठे (Abhijeet Bothe), अमोल बनसोडे (Amol Bansode), महिला दक्षता कमिटी अध्यक्षा सौ. शोभाताई वर्पे (Shobhatai Varpe), महिला उपाध्यक्षा सौ. पद्माताई जाधव (Padmatai Jadhav), शशिकांत कुमावत (Shashikant Kumavat), मा. नगरसेवक सोपानराव गिधाड (Sopanrao Gidadh), विद्यार्थी काँग्रेसचे जाईद दारुवाले (Jaid Daruwale), शहर उपाध्यक्ष समीर बेग (Sameer Beg) व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com