
श्रीगोंदा | प्रतिनिधी
पंजाब मधील (punjab) काँग्रेस (congress) पक्षाचे युवा नेते सिद्धू मूसेवाला (Sidhu Musewala) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पंजाब येथील मानसा गावामध्ये मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत मुसेवाला दुर्दैवी मृत्यू झाला.
सिद्धु मुसेवाला काही गुंडांकडून धमक्या येत होत्या. त्यानंतरही पंजाबमधील आम आदमी पक्षाने त्याची सुरक्षा काढून घेतली होती. सरकारने सुरक्षा हटवल्याच्या दुसऱ्याच दिवशी सिद्धुची हत्या करण्यात आली. या हत्येच्या निषेधार्थ दिनांक ३० मे रोजी अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस व श्रीगोंदा तालुका काँग्रेसच्या वतीने जोधपूर मारुती चौक श्रीगोंदा येथे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ह्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळुन निषेध व्यक्त केला.
अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष स्मितलभैया वाबळे यांनी आपल्या भाषणातून पंजाब मधील आप सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी नगरसेवक सतिष सर मखरे, नगरसेवक प्रशांत गोरे, नगरसेवक समीर बोरा,नगरसेवक निस्सार बेपारी, अहमदनगर युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस राहुल साळवे, श्रीगोंदा युवक काँग्रेस शहर अध्यक्ष योगेश म्हेत्रे, श्रीगोंदा तालुका विध्यार्थी काँग्रेस अध्यक्ष आदिल शेख, युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष किरण चव्हाण, सागर बेल्हेकर, भूषण शेळके आदी उपस्थित होते.