महाविकास आघाडीकडून खड्यात मुरुम टाकून कोल्हे गटाच्या नगरसेवकांचा निषेध

महाविकास आघाडीकडून खड्यात मुरुम टाकून कोल्हे गटाच्या नगरसेवकांचा निषेध

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी लहान-मोठे खड्डे (Pits) पडले असून या खड्यांचा शहरवासियांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने (Palik) या रस्त्यांसाठी निधी (Road Fund) उपलब्ध करून देवून या रस्त्यांचे नुतनीकरण करण्यात येणार होते. मात्र कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी (Corporator of the Kolhe Group) विरोध (Protest) केल्यामुळे ही कामे होवू शकली नाही. नागरिकांना दिलासा देण्यासाठी या सर्व खड्ड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress), शिवसेना (Shivsena), राष्ट्रीय काँग्रेस (National Congress) व मनसेच्या पदाधिकार्‍यांनी मुरूम टाकत कोल्हे गटाच्या नगरसेवकांचा निषेध (Protest of the corporators of the Kolhe Group) केला.

कोपरगाव (Kopargav) शहरातील रस्ते दुरुस्ती जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतरही कोल्हे (Kolhe) गटाच्या नगरसेवकांनी सोयीस्करपणे न्यायालयात नेवून ठेवली आहे. रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास पाहून कोपरगाव (Kopargav) शहरात शनिवारी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी हातात निषेधाचे (Protest) फलक घेत, घोषणा देत मोर्चा काढून रस्त्यावर पडलेल्या अनेक खड्यात मुरूम टाकून 28 विकास कामांना विरोध करणार्‍या कोल्हे गटाच्या नगरसेवकांचा निषेध नोंदविला.

शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून मागील काही दिवसांपासून सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे सर्व रस्त्यावरील सर्व खड्यात पाणी साचून नागरिकांच्या अडचणीत अधिकच भर पडली होती. या रस्त्यावरून वाहनांना खड्डे (Pits) चुकवितांना कराव्या लागत असलेल्या कसरतीमुळे अनेक छोटे-मोठे अपघात (Accident) घडत असून नागरिकांना पायी चालणे अवघड होवून बसले आहे. त्यामुळे आ.आशुतोष काळे (MLA Ashutosh kale) यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी खड्यात मुरूम टाकून व हा मुरूम रोडरोलरने दाबून नागरिकांची तात्पुरती अडचण दूर झाली आहे.

नागरिकांची अडचण तात्पुरती दूर होणार असली तरी कर भरून देखील चांगल्या रस्त्यापासून कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी वंचित ठेवल्याबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी सांगितले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना (Shivsena), राष्ट्रीय काँग्रेस (Congress) व मनसेच्या (MNS) पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. आशुतोष काळे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोपरगाव शहरासाठी 12 कोटीचा निधी आणला. हे शहरातील सर्वसामान्य नागरिक जाणून आहे मात्र आपल्या नेत्याच्या आदेशावरून विकासकामांना विरोध करणार्‍यांना 12 कोटीच्या पुढे किती शून्य असतात हे माहित नाही असा टोला गटनेते विरेन बोरावके यांनी उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी यांना लगावला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com