राहाता शहरात शिवसैनिकांकडून कर्नाटक सरकारचा निषेध

राहाता शहरात शिवसैनिकांकडून कर्नाटक सरकारचा निषेध

कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यास‌ बांगडयाचा‌ हार घालत ‌पुतळयाचे दहन केले.

राहाता | प्रतिनिधी | Rahata

कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यातील मनगुत्ती गावात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला. त्याचे पडसाद राज्यात उमटले. कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी राहाता शहरात कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यास‌ बांगडयाचा‌ हार घालत ‌पुतळयाचे दहन केले.

राहाता येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शिवसैनिकांनी शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे व शहर संघटक राजेंद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली प्रदर्शन करत, कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा‌ पुतळा हटवल्याने संताप व्यक्त केला तसेच कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com