मंदिरं खुली करण्यासाठी भाजपचं शिर्डीत शंखनाद आंदोलन

मंदिरं खुली करण्यासाठी भाजपचं शिर्डीत शंखनाद आंदोलन

शिर्डी | शहर प्रतिनिधी

सर्वसामान्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागणे बरोबरच त्यांच्या बंद पडलेल्या अर्थचक्रला चालना मिळेल यासाठी शिर्डीच्या (Shirdi) साई मंदिरासह (Sai Mandir) राज्यातील सर्व धार्मिक तीर्थस्थळे खुली करावी अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने (BJP) तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर (Rajendra Gondkar) यांनी दिला आहे.

दरम्यान राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्याच्या मागणीसाठी शिर्डीत भारतीय जनता पक्षाचे वतीने (Shirdi BJP) जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी शहरात साईबाबा मंदिर प्रवेशद्वार क्रमांक चारसमोर शंखनाद आंदोलन (BJP protest) करण्यात आले. यावेळी भाजपचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, नगरसेवक मंगेश त्रिभुवन, भाजपचे शहराध्यक्ष सचिन शिंदे, रविंद्र गोंदकर ,सचिन भैरवकर, बालमभाई इनामदार, आदिसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिर्डी नगरपंचायत प्रवेशद्वार येथुन आंदोलकांनी साई मंदिर गेट नंबर चारपर्यंत जात घोषणाबाजी केली.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी सरकारच्या मंदिर बंद धोरणा विषयी मत मांडले व महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे खुली करावी मंदिरामुळे छोट छोटी व्यवसाय चालु असतं, आर्थिक चक्र चालू असते, मंदिर बंद असल्याने आर्थिक चक्र बंद झालं आहे. आर्थिक चक्र फिरल पाहिजे जेणेकरून सर्व सामान्य माणसाला उत्पन्न मिळायला सुरुवात व्हावी. सरकाने आंदोलनाची दखल घेऊन मंदिरे खुली करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिला.

नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की, हे सरकार धार्मिक स्थळाच्या विरोधात आहे हे स्पष्ट झाले आहे. धार्मिक स्थळांना दोन डोस घेतलेल्यांना अटी व नियम लावुन शिर्डी मंदिर व महाराष्ट्रातील धार्मिक मंदिरे सुरू करण्याला अडचण काय आहे? हा खरा प्रश्न आहे, अन्यथा अनेक लोकांना स्थलांतर करावे लागेल त्याला कारणीभूत हे सरकार असेल. लवकरात लवकर धार्मिक स्थळे खुले केले नाही तर अत्यंत वाईट परिस्थिती शिर्डी आणि शिर्डी परिसरावर ओढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अल्पसंख्याक आघाडीचे बालम भाई यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, करोना महामारी रोखण्याच्या अनुषंगाने निर्बंध लागु असुन सद्य अनलॉक प्रक्रिया सुरू असतांंना धार्मिक स्थळे मात्र बंद असल्याने सर्व काही धार्मिक स्थिती किंवा छोटीमोठी उद्योग व्यवसाय फक्त धार्मिक स्थळांवर अवलंबून असणाऱ्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे, परंतु याठिकाणी साईमंदिर बंद असल्याने आर्थिक चक्र पुर्णपणे कोलमडून पडले असल्याचे बघायला मिळत आहे.

राज्यातील धार्मिक स्थळे खुली करावी यासाठी आज भाजपच्या वतीने आंदोलन केले असुन सरकार कधी धार्मिक स्थळे खुली करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागिल काही दिवसांपूर्वी देखील भाजप युवा मोर्चा वतीने देखील आंदोलन करण्यात आले होते. सरकारने नियम अटी ठेवुन धार्मिक स्थळे खुली करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. आंदोलनादरम्यान शिर्डी पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक दिपक गंधाले, गोपनीय शाखेचे अविनाश मकासरे आदीसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com