श्रीरामपूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

लखीमपूर घटनेच्या निषेधाथ
श्रीरामपूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकर्‍यांना मोटारीखाली चिरडण्याच्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. यास श्रीरामपुरात प्रतिसाद देत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार्‍यांनी स्वंयस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली होती.

महाविकास आघाडीने बंदच्या दरम्यान काल श्रीरामपुरात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिनही पक्षाचे नेते व कार्यकर्ते शिवाजी रोड, मेनरोडवक्षपन जात दुकानदारांना बंदचे आवाहन करत होते. काल महात्मा गांधी पुळ्याजवळ एकत्र जमून या घटनेचा निषेध केला. व्यापार्‍यांनीही बंदमध्ये सहभागी होऊन या घटनेचा निषेध केला. दुपारी 1 वाजेनंतर हळूहळू व्यापार्‍यांनी आपापली दुकाने उघडून व्यवहार सुरळीत केले होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर पोलिसांनी चौकाचौकात चोख बंदोबस्त ठेवला होता. अतिरीक्त पोलिसांची मागणी करण्यात आल्यामुळे काल दुपारपर्यंत श्रीरामपुरात कडक बंदोबस्त होता.

या बंदमध्ये आ. लहु कानडे, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, काँगे्रस शहराध्यक्ष संजय छल्लारे, तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक, साईनाथ कोळसे, रियाज पठाण, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे, तालुका प्रमुख दादासाहेब कोकणे, ज्येष्ठ नेते अशोक थोरे, डॉ. महेश क्षीरसागर, निखिल पवार, एकनाथ गुलदगड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लकी सेठी, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, नगरसेवक मुख्तार शहा, राजेंद्र पवार, अर्चना पानसरे, सोहेल शेख, प्रसाद पाऊलबुध्दे, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख प्रदीप वाघ शरद भणगे, यासीनभाई सय्यद, आबा बिरारी, लखन बघत, रमेश घुले, सागर हरके, रोहित भोसले, सत्तू गौड, राधाकिसन बोरकर, संजय वाघमारे, किशोर ढोकचौळे, पप्पू महाराज गायकवाड, किशोर फासगे आशिष शिंदे, गणेश सोनवणे शेखर दुबैय्या, विष्णू मोढे,अरुण पाटील, सुखदेव देवकर, राम अग्रवाल, हिरेन गुप्ता, गोटू शिंदे, राष्ट्रवादीचे योगेश जाधव, सागर कुर्‍हाडे,मल्लू शिंदे, बबनराव आदिक, निरंजन भोसले, अ‍ॅड. राजेश बोरुडे, काँग्रेसचे मुन्ना पठाण, राजू भांबारे, युवराज फंड, प्रशांत देशमुख, ज्ञानेश्वर मुरकुटे, अहमदभाई जहागिरदार, रितेश रोटे, प्रविण नवले, मनोज लबडे, अशिष धनवटे आदी सहभागी होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com