संगमनेरात भर बाजारपेठेत चालतोय वेश्याव्यवसाय

संगमनेरात भर बाजारपेठेत चालतोय वेश्याव्यवसाय

संगमनेर (शहर प्रतिनिधी) / Sangamner - संगमनेर शहर व परिसरात अवैधरित्या वेश्या व्यवसाय (prostitution) जोरात सुरू आहे. शहरातील बाजारपेठेतही हा व्यवसाय जोमात सुरू असल्याने परिसरातील व्यापारी वर्गामधून संताप व्यक्त होत आहे. बाजारपेठेत सोबतच शहरातील अनेक लॉजमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरु असताना शहर पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

उद्योग, व्यवसाय, सांस्कृतिक चळवळ व विकासाकडे वाटचाल करणारे शहर यामुळे संगमनेर शहराची राज्यात वेगळी ओळख तयार झाली आहे. अनेक शहरांमध्ये खुलेआमपणे चालणारा वेश्याव्यवसाय संगमनेर शहरात मात्र अद्याप पर्यंत सुरू झालेला नाही. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या परंपरेला छेद दिला जात आहे. शहरातील अनेक लॉजमध्ये तालुक्या बाहेरुन महिला येवून वेश्याव्यवसाय छुप्या पद्धतीने करीत आहेत. सकाळी या महिला संगमनेरात येतात आणि सायंकाळी आपापल्या गावाला निघून जातात. यामुळे शहरातील लॉजकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. राजकीय पदाधिकार्‍यांचेही शहरात लॉज असल्याने पोलिसांचे या लॉजमध्ये चालणार्‍या वेश्याव्यवसायाकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. एकेकाळी अनेकदा ओस पडलेल्या लॉजमध्ये आता नेहमी गर्दी असते. यातील अनेक खोल्यांमध्ये छुप्प्या पद्धतीने वेश्या व्यवसाय सुरू आहे. 18 ते 28 वर्ष वयाच्या अनेक युवतीही संगमनेरात या लॉजच्या परिसरात फिरताना दिसत आहे. काही लॉजने लॉजिंगची परवानगी नसतानाही त्यांनी छोट्या खोल्या बांधून महिलांची व्यवस्था करून दिली आहे, यातून त्यांना बक्कळ पैसा मिळत आहे.

लॉज मध्ये चालणारा वेश्याव्यवसाय आता थेट बाजारपेठेतही घुसला आहे. बाजारपेठेतील एका इमारतीमध्ये हा व्यवसाय छुप्या पद्धतीने सुरू आहे. या इमारतीमध्ये अनेक महिला व पुरुष ये-जा करताना दिसत आहे. यामुळे परिसरातील नागरिक व व्यापारी मधून संताप व्यक्त होत आहे. याबाबत या नागरिकांनी शहर पोलिसांना वेळोवेळी कळवूनही पोलिसांनी याबाबत कारवाई केलेली नाही. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी यात लक्ष घालून या व्यवसायावर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com