पुढील गळीत हंगामासाठी ऊसाला प्रती क्विंटल ३०५ रुपये एफआरपी देण्याचा केंद्राकडे प्रस्ताव

पुढील गळीत हंगामासाठी ऊसाला प्रती क्विंटल ३०५ रुपये एफआरपी देण्याचा केंद्राकडे प्रस्ताव

नेवासा | तालुका प्रतिनिधी

शेतकऱ्यांना पुढील वर्षी आपल्या ऊस विक्री दरात २.५ टक्के वाढ मिळेल अशी शक्यता असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

कृषी उत्पादन खर्च आणि दर आयोगाने (सीएसीपी) उताऱ्याच्या दरात ०.२५ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यानुसार नव्या दराची आकारणी होणार आहे. जर केंद्र सरकारने सीएसीपीच्या शिफारशी स्वीकारल्या तर ऊस दराची एफआरपी २०२२-२३ या गळीत हंगामात (ऑक्टोबर-सप्टेंबर) १०.२५ टक्के रिकव्हरीसाठी ३०५ रुपये प्रती क्विंटल असेल.

सध्याच्या २०२१-२२ या चालू हंगाात १० टक्के रिकव्हरीसाठीचा एफआरपी दर २९० रुपये प्रती क्विंटल आहे. जेवढा अधिक उतारा असेल, त्यानुसार ऊसाची किंमत अधिक असेल. उसाचा रिकव्हरी दर उत्पादीत साखरेच्या तुलनेत अधिक आहे, रसावर आधारित हा दर ठरतो.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com