महापौर निवडणुकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे

महापौर निवडणुकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनामुळे महापौर निवडणुकीवर तांगती तलवार असतानाच निवडणुकीचा प्रस्ताव महापालिकेकडून नाशिक येथील विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. यामुळे राजकीय घडामोडीला वेग आला आहे. तर दुसरीकडे विभागीय आयुक्त निवडणुकीबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष लागले आहे.

विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ येत्या 30 जून रोजी संपुष्ठात येणार आहे. त्यांचा कार्यकाळ संपुष्ठात येण्यापूर्वी निवडणूक घेऊन नवीन महापौरांची निवड होणे अपेक्षित आहे. नगरविकास विभागाने तसा प्रस्ताव मनपा आयुक्तांना दिला. तो प्रस्ताव आयुक्तांनी नाशिक विभागाच्या आयुक्तांकडे सादर केला आहे. पुढील पंधरा दिवसामध्ये म्हणजे जूनच्या दुसर्या आठवड्यात आगामी महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणुक होण्याची शक्यता आहे.

यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपाची सत्ता आहे. त्यात आता राज्याच्या राजकारणात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडी आहे. महापौर निवडणुकीत हे तीन पक्ष एकत्र येतात का याची उत्सुकता नगरकरांना लागली आहे. आगामी महापौरपद अनुसूचित जाती जमातीतील महिलांसाठी राखीव झाले आहे. भाजप वगळता सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांकडे महापौरपदासाठी महिला उमेदवार आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com