चिलेखनवाडी वीज उपकेंद्राला कुलुप लावताच कर भरण्याचे आश्वासन

चिलेखनवाडी वीज उपकेंद्राला कुलुप लावताच कर भरण्याचे आश्वासन

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील चिलेखनवाडी (Chilekhanwadi) येथील माहापारेषन कंपनीचे (Mahapareshan Company) 33/11 के.व्ही. वीज उपकेंद्राकडील तीन वर्षाचा मालमत्ता कर वारंवार मागणी करुनही भरणा न केल्याने अखेर ग्रामपंचायतीने वीज उपकेंद्रास कुलूप ठोकले. (Grampanchayat Locked the Power Substation)

मात्र नेवासा उपविभागाचे अभियंते शरद चेचर यांनी थकीत कर 21 दिवसात अदा केला जाईल असे लेखी स्वरूपात ग्रामपंचायतीस दिल्यानंतर त्याच सायंकाळी 6 वाजता उपकेंद्राचे कुलूप काढण्यात आले.

चिलेखनवाडी ग्रामपंचायत (Chilekhanwadi Grampanchayat) हददीत महापारेषन कंपनीचे 33/11 के.व्ही.वीज उपकेंद्र आहे. उपकेंद्र स्थापनेपासून ग्रामपंचायत मालमत्ता कर वसूल करते. परंतु मागील तीन वर्षाचा थकीत मालमत्ता कर रुपये 4 लाख 77 हजार 811 रुपये थकीत कर लेखी व तोंडी मागणी करूनही कंपनीने कर भरला नाही. सात दिवसात कर भरला नाही तर उपकेंद्र सील (Substation Seal) करण्यात येईल अशी नोटीस पारेषन कंपनीस ग्रामपंचायतीने दि. 4 ऑक्टोबर रोजी दिली होती. मात्र कंपनीने काहीही दखल न घेतल्याने सरपंच प्रा. भाऊसाहेब सावंत, ग्रामसेवक,पदाधिकाऱ्यांनी अखेर दि.11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता चिलेखनवाडी उपकेंद्र (Chilekhanwadi Substation) कुलुप लावून सील केले.

या उपकेंद्राअंतर्गत असणारा येथील लोचनाबाई ऑक्सिजन प्रकल्प बंद पडल्याने मोठा गोंधळ उडाला.सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑाक्सिजनची मागणी वाढली आहे. जिल्हयातील अनेक रुग्णालयांना येथून ऑक्सिजन पुरवठा (Oxygen Supply) होतो.या घटनेची नेवासा पोलिस ठाण्याचे (Newasa Police Station) पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार (Police Inspector Bajirao Powar) यांनी गांभिर्याने दखल घेतली. पारेषन कंपनीचे अधिकारी आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांना एकत्रीत बैठक बोलावून तोडगा काढण्याचे सूचवले त्यानुसार नेवासा उपविभागाचे अभियंते शरद चेचर यांनी थकीत कर 21 दिवसात अदा केला जाईल असे लेखी स्वरूपात ग्रामपंचायतीस दिल्यानंतर सायंकाळी 6 वाजता उपकेंद्र खुले करण्यात आले.

Related Stories

No stories found.