महिलेचे दोन तोळ्याचे गंठण ओरबाडले

प्रोफेसर कॉलनी चौकातील घटना
महिलेचे दोन तोळ्याचे गंठण ओरबाडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रस्त्याने पायी जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण (Chain Santching) दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ओरबाडून धूम ठोकली. सावेडी उपनगरातील (Savedi) प्रोफेसर कॉलनी चौक (Professor Colony Chowk) ते प्रेमदान चौक (Premdan Chowk) जाणार्‍या रोडवर गुरूवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) जबरी चोरीचा गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे.

सीमा संतोष गोबरे (वय 47 रा. मार्केडेय सोसायटी, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी गोबरे या गुरूवारी रात्री त्यांच्या मुलाला आणण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. प्रोफेसर कॉलनी चौक ते प्रेमदान चौक या रस्त्यावरून त्या जात असताना पंढरपुरी चहाजवळ समोर आलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने गोबरे यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण ओरबाडले.

चोरटे भिस्तबाग चौकाकडे जाणार्‍या रस्त्याने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, उपनिरीक्षक समाधान सोळुंके, संपत कन्हेरे यांनी घटनास्थळी भेट दिली. गोबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके करीत आहेत.

तोफखान्याच्या ‘डिबी’चे अपयश

प्रोफेसर कॉलनी चौकात रात्रीच्यावेळी मोठी गर्दी असते, अशा वेळी चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ओरबाडून धूम ठोकली. यामुळे तोफखाना पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान सावेडी उपनगरात वारंवार सोनसाखळी चोरीच्या घटना घडूनही तोफखाना पोलिसांना त्या उघडकीस आणण्यात अपयश आले आहे. तोफखाना पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण (डिबी) शाखेकडून अपेक्षीत काम होताना दिसत नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com