प्राध्यापक मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक करा

सोनई पोलिसांना निवेदन
प्राध्यापक मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक करा

सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयातील प्राध्यापक व सुरक्षारक्षकाला झालेल्या मारहाणी प्रकरणी आरोपींना लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्यात यावी यासाठी प्राध्यापक संघटनेच्यावतीने सोनई पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात टवाळखोरांनी महाविद्यालयाच्या मुलींची छेड काढली. याविषयी सुरक्षारक्षकांनी हटकवल्यावरून महाविद्यालयाचे उपप्राचार्य दशरथ आयनर व सुरक्षारक्षक पाराजी तागड यांच्यावर हल्ला केला. आरोपींना अटक करून कारवाई करण्यात यावी याविषयीचे निवेदन सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना देण्यात आले आहे.

सोनई महाविद्यालय परीसरात तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी केलेली कारवाईबद्दल प्राध्यापकांनी आभार मानले असून परिसरात पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी केल्याने माणिक चौधरी यांनी मुलींच्या सुरक्षिततेसाठी कायम कारवाई मोहीम राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी मुळा संस्थेचे प्रशासन अधिकारी प्रा. अशोक तुवर, प्रा. संभाजी दराडे, प्रा. विठ्ठलराव दरंदले, प्रा. मनीषा कदम, प्रा. आशा आयनर, प्रा. किशोर निमसे, प्रा. प्रकाश गडाख, प्रा. संतोष सुकाळकर यांचेसह प्राध्यापक उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com