नेवाशात मिरवणुकीदरम्यान दोन गटांत वाद प्रकरणी 8 तरुणांना अटक

दोन दिवसांची पोलीस कोठडी
नेवाशात मिरवणुकीदरम्यान दोन गटांत वाद प्रकरणी 8 तरुणांना अटक

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा शहरात रामनवमी मिरवणुकी दरम्यान काही समाजकंटकांनी जातीय तणाव निर्माण करून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण केल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यावर 8 आरोपींना अटक करण्यात आली असून नेवासा न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी तपासाच्या अनुषंगाने घटनास्थळी भेट देऊन सूचना दिल्या होत्या. आरोपी शोधकामी तपासपथके तयार करून आरोपींचा शोध घेत असताना रेहान अरिफ शेख (वय 22), फजल युसूफ शेख (वय 22), इम्रान जमिर शेख (वय 27), सद्दाम जमीर शेख (वय 24), सलमान जमीर शेख (वय 20), सोहेल युसूफ शेख उर्फ जहागिरदार (वय 22), मुसा याकुब बागवान (वय 50) व सलमान मुसा बागवान (वय 24) सर्व रा. नाईवाडी गल्ली नेवासा खुर्द या 8 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.ा

शांतता कमिटी बैठकांचा सोपस्कार

प्रत्येक सण उत्सवाला शांतता कमेटीच्या बैठकीची औपचारिकता केली जाते. बैठका अचानक घेतल्या जातात. त्यामुळे बैठकांना सदस्य उपस्थित राहत नाहीत. शांतता कमेटीची नव्याने रचना करणे गरजेचे आहे.

पोलीस बंदोबस्ताच्या अभावाचा परिणाम

शहरातील नगरपंचायत परिसरात दोन ठिकाणी दगडफेक झाली. मोठ्या प्रमाणावर जमाव जमलेला असताना व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असताना पोलीस बंदोबस्त नव्हता. मिरवणूक सुरू असताना एक अधिकारी, एक पोलीस कर्मचारी मिरवणुकीत बंदोबस्त करत होते. या ठिकाणी जास्त पोलीस बंदोबस्त पोलीस निरीक्षक यांनी दिला असता तर मिरवणूक शांततेत पार पडली असती असे नागरिकांमधून बोलले जात आहे. डीजेला परवानगी नव्हती तर मिरवणूक सुरु झाल्यावर बंद का केला नाही? असाही सवाल केला जात आहे.

Related Stories

No stories found.