तलाठी संपामुळे विद्यार्थी व शेतकऱ्यांची अडचण

तलाठी संपामुळे विद्यार्थी व शेतकऱ्यांची अडचण

पिंपरी निर्मळ | वार्ताहर

आठवड्याभरापासुन सुरु असलेल्या तलाठी संपाचा (talathi strike) फटका सर्व सामान्याला बसत आहे. उत्पन्नाचे दाखले, बँकाचे इकरार, फेरफार नोंदी व सातबारा मिळत नसल्याने विदयार्थी (students) व शेतकरी (farmers) मेटाकुटीस आले आहेत.

तलाठयांचा आठवडा भरापासुन संप सुरू आहे. त्यामुळे त्यांचे कामकाज बंद असल्याने विदयार्थी व शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शाळा कॉलेजसाठी तसेच विविध वैदयकीय कामांसाठी उत्पन्नाचे दाखले लागतात. सपांमुळे विदयार्थी व रूग्नांचे हाल होत आहेत.

तर सध्या सेवा सोसायट्यांकडून रब्बीचे पिक कर्ज वाटप सुरू झाले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा उतारे, इकरार व फेरफारची गरज असते. मात्र तलाठयांच्या संपामुळे कामकाज बंद आहे, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

रब्बीचे पिक विमे भरण्याचेही सध्या काम सुरू आहे. मात्र तलाठयांच्या संपांमुळे शेतकऱ्यांना सातबारा उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकरी पिक विमा भरण्यापासुन वंचित राहण्याची भिती व्यक्त होत आहे. शासनाने शेतकरी व विदयार्थी यांची अडचण लक्षात घेवुन पर्यायी व्यवस्था तयार करण्याची मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com