
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
प्रो-कबड्डीच्या (Vivo Pro Kabaddi) नवव्या हंगामाचा लिलाव दि. 5 ऑगस्टपासून मुंबईत (Mumbai) सुरू आहे. या लिलावात भेंड्याच्या (Bhenda) शंकर गदाईसाठी (Shankar Gadai) 30 लाखाची तर राहुल खाटीकसाठी (Rahul Khatik) 10 लाखाची व राहुल धनवडेसाठी 10 लाखाची बोली (Bid) लागली आहे.
मुंबईत हा लिलाव (Auction) पार पडत असून अ, ब, क आणि ड अशी चार वर्गवारी करण्यात आल्या आहेत. 'अ' कॅटेगरीमधील खेळाडूची बेस प्राइझ 30 लाख, 'ब' मधील खेळाडूची 20 लाख, 'क' मधील खेळाडूची 10 लाख आणि 'ड' मधील खेळाडूची 6 लाख रुपये आहे. प्रत्येक संघाला कमीतकमी 2 आणि जास्तीत जास्त 4 विदेशी खेळाडू घेता येणार. या लिलावात पहिल्या दिवशी पवनकुमार सहरावत याला 2 कोटी 26 लाख रुपयांची सर्वाधिक बोली लागली. प्रो कबड्डीच्या (Pro Kabaddi) इतिहासात आजपर्यंत एवढी बोली कोणालाही लागलेली नाही. याआधी प्रदीप नरवाल याला 1 कोटी 65 लाख रुपयांची बोली (Bid) लागली होती.
क-कॅटेगरीसाठी (10 लाख बेस प्राइझ) लिलाव झालेले स्थानिक खेळाडू असे....
आशिष सांगवाण 10 लाख (यु मुंबा संघ), सचिन नरवाल 10 लाख (बंगळुरू बुल्स), गुरदीप 10 लाख (यूपी योद्धा) तनुषण लक्ष्मणमोहन 10 लाख (तमिळ थलायवाज), मोहम्मद आरिफ रब्बानी 10 लाख (तमिळ थलायवाज), अक्रम शेख 32 लाख 10 हजार ( गुजरात जायंट्स), शंकर भीमराज गदाई 30 लाख 30 हजार (गुजरात जायंट्स), बालाजी डी 20 लाख 60 हजार (बंगाल वारीयर्स), विनोद कुमार 10 लाख (बंगाल वारीयर्स), राहुल खाटीक 10 लाख (पाटणा पायरेट्स), अब्दुल इंसामम 10 लाख (पाटणा पायरेट्स), के. हनुमंथु 10 लाख (तेलगू टायटन्स), परवीन सतपाल 10 लाख, (बंगाल वारीयर्स), राहुल धनवडे 10 लाख (जयपुर पिंक पँथर), सौरभ गुलीया 10 लाख (गुजरात जायंट्स), रिंकू नरवाल 40 लाख (गुजरात जायंट्स), संदीप कंडोला 10 लाख ( गुजरात जायंट्स), हरेंदर कुमार 20 लाख (यु मुंबा), सुरेंदर नाडा 10 लाख (बंगाल वारीयर्स), अमित हुड्डा 10 लाख (दबंग दिल्ली), सुधाकर कदम 10 लाख, (बंगाल वारीयर्स), अनिल कुमार 10 लाख (दबंग दिल्ली), विनोद कुमार 10 लाख (गुजरात जायंट्स), आदर्श टी. 10 लाख (तेलगू टायटन्स), बलदेव सिंग 21 लाख 50 हजार (गुजरात जायंट्स), रविंदर पहल 23 लाख, (तेलगू टायटन्स), शुभम शिंदे 20 लाख 30 हजार (बंगाल वारीयर्स), शिवम चौधरी 15 लाख 20 हजार (पाटणा पायरेट्स), रवी कुमार 64 लाख 10 हजार (दबंग दिल्ली).
लिलाव झालेले विदेशी खेळाडू असे...
डॅनियल10 लाख (पाटणा पायरेट्स), सुलेमान पहलवानी 10 लाख (बंगाल वारीयर्स), अमीर हुसेन बस्तानी 65 लाख 10 हजार (हरयाणा स्टीलर्स), ओसंको 10 लाख (जयपूर पिंक पँथर्स), रझा मीरबागेरी 26 लाख 80 हजार (जयपूर पिंक पँथर्स), जेम्स नमाबा कामवेटि 10 लाख (यूपी योद्धा), डाँग चेन ली 20 लाख (गुजरात सुपरजायंट्स), हैदर अली इकरामी 14 लाख (यु मुंबा), नागेशोर थारू 10 लाख (बंगळुरू बुल्स), लाल मोहर यादव 10 लाख (बंगळुरू बुल्स), अबुझर मिगाणी 20 लाख (यूपी योद्धा), मोहम्मद इस्माईल 10 लाख 50 हजार (हरयाणा स्टीलर्स), यांगचेन 10 लाख (गुजरात जायंट्स), रझा 10 लाख (दबंग दिल्ली), जाफरी 10 लाख (तेलगू टायटन्स).
नुकत्याच हरियाणा येथे झालेल्या 69 व्या राष्ट्रीय चांपेयिनशीप कबड्डी स्पर्धेत (National Championship Kabaddi Tournament) महाराष्ट्र संघामध्ये (Maharashtra Team) समावेश आलेल्या भेंडा येथील शंकर गदाई (कर्णधार महाराष्ट्र संघ) व राहुल खाटीक (खेळाडू) यांचा प्रो-कबड्डीच्या नवव्या हंगामासाठी लिलाव (Pro-Kabaddi Season Auction) झाला. त्यात शंकर गदाईसाठी 30 लाख 30 हजार रुपयांची बोली लागून लिलाव झाला असून तो गुजरात जायंट्स संघासाठी खेळणार आहे. तर राहुल खाटीकसाठी 10 लाख रुपयांची बोली लागली असून तो पाटणा पायरेट्स संघासाठी खेळणार आहे. तर राहुल धनवडेसाठी 10 लाखाची बोली लागली असून तो जयपुर पिंक पँथरसाठी खेळणार आहे. गदाई व खाटीक, धनवडे या खेळाडूंचे शिक्षण संस्था, महाविद्यालय व भेंडा ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.