संगमनेरात कत्तलखान्यांविरोधात हिंदूत्ववादी संघटना एकवटल्या

प्रांत कार्यालयासमोर जोरदार ठिय्या आंदोलन
संगमनेरात कत्तलखान्यांविरोधात हिंदूत्ववादी संघटना एकवटल्या

संगमनेर | शहर प्रतिनिधी

संगमनेर (sangamner) शहरातील बेकायदेशिरपणे सुरु असलेले कत्तलखाने (Illegal Slaughterhouse) उध्वस्त करावे, आरोपींना तडीपार करावे, शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख (PI Mukund Deshmukh) यांना निलंबित करावे या मागणीसाठी आज संगमनेरात (Sangamner) हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढत प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

2 ऑक्टोबर 2021 रोजी बजरंग दलाच्या (Bajarang dal) पदाधिकार्‍यांनी पोलीस अधिकार्‍यांसमवेत येत संगमनेरातील कत्तलखान्यांवर (slaughterhouses in sangamner) छापा टाकला होता. या छाप्यात 1 कोटी 4 लाखांचे गोमांस मिळून आले आहे. संगमनेरात सर्रास कत्तलखाने सुरु असतांना पोलिस (Police) प्रशासनाचा वचक राहिला नसल्याचे या घटनेने दिसून आले आहे.

राज्यात गोवंश हत्या बंदी (Anti-cow slaughter law) असतांना देखील संगमनेरात (sangamner) कत्तलखाने सुरुच आहे. या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आज सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चा काढला. पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत मोर्चा प्रांत कार्यालयावर येवून धडकला.

मोर्चात पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष प्रा. एस. झेड. देशमुख, बजरंग दलाचे गोलू ठाकूर, भाजपाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले, भाजपाचे ज्ञानेश्‍वर कर्पे, राजेंद्र देशमुख, अमोल खताळ, शिवसेनेचे आप्पासाहेब केसेकर, परदेशी, सुदर्शन इट्टप आदि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे.

मागण्या मान्य होईपर्यंत प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन आंदोलनकर्त्यांनी सुुरु केले आहे. आंदोलनकर्त्यांना प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने हे सामोरे गेले. मात्र आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने ठिय्या आंदोलन सुरुच आहे.

Related Stories

No stories found.