खासगी सावकारांच्या छळास कंटाळून शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

खासगी सावकारांच्या छळास कंटाळून शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

उंबरे |वार्ताहर| Umbare

खासगी सावकाराच्या सततच्या तगाद्यामुळे राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील शेतकरी जालिंदर ठकाजी वने यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, रूग्णालयात उपचार घेत असताना तेथे काही खासगी सावकारांनी जाऊन तुझ्याकडे आमचे कोणतेही पैसे नाहीत, असा निर्वाळा दिला. मात्र, वने हे उपचार घेऊन घरी येताच त्या खासगी सावकारांनी पुन्हा त्यांच्याकडे तगादा सुरू केला आहे. त्यामुळे आता पुन्हा या खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा पवित्रा घेतला आहे.

खासगी सावकारांच्या छळास कंटाळून शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न
मुळात 16500 दलघफू पाणीसाठा

दरम्यान, खासगी सावकारांच्या या सततच्या मानसिक छळामुळे हवालदिल झालेल्या वने यांच्या वडिलांना ह्दयविकाराचा झटका येऊन त्यांनीही या जगाचा अखेरचा निरोप घेतला. मात्र, निर्ढावलेल्या त्या सावकारांनी वने यांच्या गळ्याभोवती सावकारी पाश आणखी घट्ट केला आहे. त्यामुळे आता हताश झालेल्या त्या शेतकर्‍यासमोर पुन्हा आत्महत्येचा मार्ग दिसू लागला आहे. ते सावकार कोण? याबाबत विचारणा करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

खासगी सावकारांच्या छळास कंटाळून शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न
नगर शहर शिवसेनेची लवकर फुटीच्या दिशेने वाटचाल ?

राहुरी तालुक्यात पोलिसांच्या छुप्या आशिर्वादामुळे खासगी सावकारीला उधाण आले आहे. राज्यात सावकारीला बंदी असली तरी पोलिसांनी खतपाणी घातल्याने अनेक खासगी सावकार शेतकर्‍यांना रक्कम देऊन दामदुप्पट रक्कमेची लूट करीत असल्याच्या घटना ताज्या असतानाच आता ब्राम्हणी येथील शेतकरीही हवालदिल झाले आहेत. ब्राम्हणी येथील काही खासगी सावकारकी करणार्‍यांनी वने यांना घरी जाऊन दमदाटी करून त्यांच्या कुटुंबातील महिलांना शिवीगाळ करीत पठाणी वसुलीचा गोरखधंदा सुरू केला आहे.

खासगी सावकारांच्या छळास कंटाळून शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न
बनावट सातबारे बनवून आयडीबीआय बँकेला 26 लाखांचा गंडा

रात्रंदिवस वने यांंना त्या खासगी सावकारांच्या दबंगगिरीला सामोरे जावे लागत असल्याने वने यांचे शेतकरी कुटुंब हवालदिल झाले आहे. काही वर्षापूर्वी वने यांनी त्या खासगी सावकारांकडून सुमारे 16 लाख रुपये शेतीसाठी घेतले होते. त्याची वने यांनी व्याजासह परतफेड करून सुमारे 20 लाखाहून अधिक रक्कम त्या खासगी सावकारांना दिली आहे. मात्र, अद्यापही वने यांच्याकडे पैशाचा तगादा सुरू असल्याने वने कुटुंबाची मानसिकता आत्महत्या करण्याइतपत झाली आहे. याबाबत सावकारांकडे विनंत्या करूनही त्यांची दबंगगिरी सुरू असल्याने वने हे पुन्हा आत्महत्येच्या पवित्र्यात असून याप्रकरणी पोलिसांनी त्या खासगी सावकारांवर कारवाई करण्याची मागणी अन्य शेतकर्‍यांनी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

खासगी सावकारांच्या छळास कंटाळून शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न
तांदुळवाडीतून 49 तर वाघाचा आखाडा ग्रामपंचायतीसाठी 38 उमेदवारी अर्ज

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com