‘या’ तालुक्यात माजी नगरसेवकासह तिघांवर सावकारकीचा गुन्हा

कर्जदाराचा छोटा हत्ती, मोटारसायकल नेली ओढून
‘या’ तालुक्यात माजी नगरसेवकासह तिघांवर सावकारकीचा गुन्हा

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड (Jamkhed), कर्जत (Karjat) या दुष्काळी तालुक्यांना खासगी सावकारकीचा (Private Lender) वेढा पडला आहे. अशातच आता येथिल एका माजी नगरसेवकासह (Former corporators) तीघांवर सावकारकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी कर्जदाराचा (Borrower) छोटा हत्ती हे चारचाकी वाहन व दुचाकी बळजबरीने ओढून नेली असल्याचे समोर आले आहे.

संदीप सुरेश गायकवाड असे माजी नगरसेवकाचे नाव असून शेखर बाळू रिटे (दोघे रा. गोरोबा टाकी, जामखेड) त्यांच्या इतर एका साथीदारालाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी जामखेड तालुक्यातील (Jamkhed Taluka) पिंपळगाव आवळा (Pimpalgav Avala) येथिल अशोक दत्ता बोबडे (वय 22 वर्षे ) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी गायकवाड यांच्याकडून 1 लाख रूपये घेतले होते. 23 सप्टेंबरला अचानक घरी येऊन गायकवाड यांनी कर्जाची रक्कम लगेच मागीतली. परंतु रक्कम देण्यास फिर्यादी अशोक बोबडे यांनी असमर्थता दाखवत दोन दिवसात पैसे देण्याचे अश्वासन दिलेे.

मात्र संशयितांनी त्याचे ऐकून न घेता त्यांचा दिड लाख रूपये किंमतीचा टाटा कंपनीचा छोटा हत्ती नंबर (एम एच 16 सी सी 2239) व अंदाजे 50 हजार रूपये किंमतीची हरो कंपनीची स्प्लेंडर मॉडेलची मोटर सायकल (एम एच 16 सी आर 9008) यांच्या चाव्या बळजबरीने काढून घेऊन गेले. त्यानंतर गायकवड यांनी बोबडे यांच्या आई वडिलांकडून सर्व कुटुंबियांचे आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card) घेऊन गेले त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता असल्याने बोबडे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

याप्रकरणी गायकवाड व इतर दोघांवर भा.द.वि. कलम 327, 34 प्रमाणे महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायदा कलम 39 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड (Police Inspector Sambhaji Gaikwad) यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे (Assistant Inspector of Police Sunil Bade) हे करत आहेत.

राजकीय कारकीर्द धोक्यात

नगरसेवक संदीप गायकवाड यांचेवर हा गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. लवकरच आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवार म्हणून संदिप गायकवाड यांच्याकडे पाहीले जात असताना दाखल झालेल्या या गुन्ह्यामुळे गायकवाड यांची राजकीय कारकीर्द अडचणीत येऊ शकते. अशी शहरभर चर्चा आहे.

Related Stories

No stories found.