खाजगी हॉस्पिटलमधून होणारी लूटमार थांबवा, अन्यथा कारवाई

मनपा आरोग्य समिती : शासकीय ऑडिटरांना कोविड हॉस्पिटलमध्ये बसण्यासाठी हवीय जागा
खाजगी हॉस्पिटलमधून होणारी लूटमार थांबवा, अन्यथा कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनासंसर्ग विषाणूच्या काळात प्रत्येक नागरिक भयभीत झाला असून या संकटाला सामोरे जात आहे. रुग्णांचे नातेवाईक उपचार मिळण्यासाठी खाजगी हॉस्पिटलांची मनधरणी करत आहेत. मात्र, काही हॉस्पिटलचे संचालक याचा गैरफायदा घेत रुग्णांच्या नातेवाइकांकडून शासनाने दिलेल्या बिलासंदर्भातील आदेशाची पायमल्ली करून मोठ्या प्रमाणात लूटमार करत असल्याचे समोर आले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणेच बिलाची आकारणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून करावी अशी मागणी मनपा आरोग्य समितीच्यावतीने खाजगी हॉस्पिटलांना नेमून दिलेल्या शासनाच्या ऑडिटरकडे केली आहे.

तसेच रुग्णांच्या नातेवाईकांन कडून खाजगी हॉस्पिटल चालकांनी लूट थांबवावी अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा या समितीच्या वतीने देण्यात आला. मनपा आरोग्य समितीच्या वतीने नेमून दिलेल्या खाजगी हॉस्पिटलच्या ऑडिटररांची मनपामध्ये आढावा बैठक झाली. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे, सदस्य निखिल वारे, सदस्य सचिन जाधव, सदस्य सतिष शिंदे, ऑडिटर प्रवीण मानकर, निवृत्ती खेतमाळीस, राजेंद्र येळीकर, सुरेश घायमुक्ते, रमेश कासार, भाग्यश्री जाधव आदी उपस्थित होते.

आरोग्य ही मानवसेवा समजून प्रत्येक डॉक्टरांनी सेवा द्यावी, संकट काळामध्ये प्रत्येकाला सहकार्‍याची खरी गरज आहे. या संकट काळात कोणीही गैरफायदा उचलू नये, काही हॉस्पिटलचे विविध प्रकरणे पुराव्यासहित आमच्याकडे आले आहेत. शासनाच्या कोणत्याही अटी-शर्तीचे पालन यांच्याकडून केल्याचे दिसून येत नाही. तरी प्रत्येकाने मानवसेवेच्या भावनेतून काम करावे, तसेच बिल भरण्याच्या अगोदरच शासकीय नियमांचे पालन झाले की नाही याची तपासणी होणे गरजेचे आहे.

यावेळी शहरातील काही रुग्णालय शासनाने ठरवून दिलेल्या आदेशामध्ये पळवाटा काढून करोना रुग्णांना वाढीव बिले देऊन लूट करत आहे. काही खाजगी रुग्णालयाने अजूनपर्यंत आम्हाला हॉस्पिटलमध्ये बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली नाही, करोनारुग्णांच्या पेशंटला डिस्चार्ज देण्याच्या संदर्भात पूर्वकल्पना ऑडिटरला दिली जात नाही. यामुळे संबंधीत हॉस्पिटलमध्ये ऑडिटरला हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शासकीय ऑडिटर यांच्यावतीने यावेळी करण्यात आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com