खासगी हॉस्पिटल अन् आयएमएशी चर्चा करून ऑक्सिजनचा पुरेसा साठा करा

करोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांचे तालुक्याला आदेश
खासगी हॉस्पिटल अन् आयएमएशी चर्चा 
करून ऑक्सिजनचा पुरेसा साठा करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या संभाव्य (Corona) तिसर्‍या लाटेचा (Third Wave) सामना करण्यासंदर्भात जे नियोजन केले जात आहे. ते मूर्त स्वरुपात येण्यासाठी तालुकास्तरावर सर्व यंत्रणांनी तेथील खाजगी हॉस्पिटल्स (Private Hospitals) तसेच स्थानिक इंडियन मेडीकल असोसिएशनच्या (Local Indian Medical Association) पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन संबंधित ठिकाणी पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होईल, यासाठीची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Rajendra Bhosale) यांनी दिल्या.

करोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या (Third Wave) अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी सुरु (District Administration Preparations Strong) आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले (Collector Dr. Bhosale) हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सातत्याने तालुका प्रशासनाच्या संपर्कात आहेत. मंगळवारी पुन्हा झालेल्या ऑनलाईन बैठकीला (Online meeting) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर (ZP CEO Rajendra Kshirsagar), उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे आदी जिल्हा मुख्यालय येथून तर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे तालुका स्तरावर उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी इंडियन मेडीकल असोसिएशनच्या स्थानिक पदाधिकारी यांच्यासोबत बैठका घेऊन संभाव्य लाटेच्या अनुषंगाने आवश्यक ऑक्सिजनसाठी कार्यवाही करणे अपेक्षित आहे. जी हॉस्पिटल्स 50 पेक्षा जास्त बेडस क्षमतेची आहे, त्यांनी त्यांना आवश्यक असणारा ऑक्सिजन साठवण्यासाठीची व्यवस्था (Oxygen Storage System) कऱणे अपेक्षित आहे. त्यासाठी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणी, जम्बो सिलींडर, ड्युरा सिलींडरची व्यवस्था आदींची सुविधा करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ऑक्सीजन निर्मिती (oxygen Production) करणार्‍या उद्योगांबरोबर करार करुन घेणे आवश्यक आहे.

तालुका पातळीवर ही कार्यवाही वेगाने होणे अपेक्षित आहे. प्रत्येक हॉस्पिटल्सने किमान तीन दिवस पुरेल एवढा ऑक्सिजन साठा राखीव ठेवणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे त्यासाठी आतापासूनच तयारी कऱणे अभिप्रेत आहे. ज्या हॉस्पिटल्सची ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारणी क्षमता नाही, अशा छोट्या हॉस्पिटल्सने एकत्र येत लिक्विड मेडीकल ऑक्सीजन साठी साठवणूकीची क्षमता निर्माण करणे आणि ऑक्सीजन मिळण्यासाठी संबंधित कंपन्यांबरोबर करार करणे आवश्यक आहे.

..................

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com