
संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
शहरात असलेल्या कारागृहातील (Prison) एका आरोपीने (Accused) भिंतींवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Suicide Try) केला आहे. ही घटना शुक्रवार ता. (15) सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शोहेब शब्बीर शेख या आरोपीला (Accused) गेल्या काही दिवसांपासून संगमनेर येथील कारागृहामधील बराक नंबर एकमध्ये ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शेख याने भिंतींवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Suicide Try) केला. यावेळी डोक्याला मार लागल्याने त्याला तातडीने औषधोपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात (Ghulewadi Rural Hospital) दाखल करण्यात आले होते.
याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक आशिष आरवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी शोहेब शेख याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 799/2023 भारतीय दंड संहिता कलम 309 प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब घोडे हे करत आहे.