साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात, साईभक्तांना...

साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात, साईभक्तांना...
सीईओ भाग्यश्री बानायत

शिर्डी (शहर प्रतिनिधी)

सबका मालिक एक असा संदेश देणारे श्री साईबाबांचा लौकिक सर्वदूर पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून साईभक्त हा महत्त्वाचा घटक म्हणून त्यांना सेवा सुविधा पुरविण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया श्री साईबाबा संस्थानच्या नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी प्रसारमाध्यमांपुढे बोलताना दिली.

श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या जागेवर नागपूर येथील रेशीम उद्योग महामंडळाच्या संचालिका भाग्यश्री बानायत यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी काल सोमवार दि. ६ रोजी सकाळी श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सुत्रे हाती घेऊन पदभार स्विकारला. त्यानंतर त्यांनी संस्थानच्या लेंडी बागेतील साईसभागृहात पत्रकार परिषद घेतली.

याप्रसंगी त्यांनी सांगितले की, माझ्या हातून चांगली सेवा घडावी हा साईबाबांचा आदेश आहे. मला आज बाबांच्या दरबारात येऊन खूप आनंद झाला आहे. प्रयत्न राहाणार आहे. साई संस्थानचे अर्थकारण सुरळीत करणे यादृष्टीने प्रयत्न राहाणार आहे. बाबाच्या काळापासून चालत आलेल्या प्रथा, परंपरा याचा अभ्यास करून कामकाज करणार आहे. मंदिरे सुरू होतील तेव्हा भाविकांना सर्व सुविधा तसेच कोविड नियमानुसार अटीशर्ती पाळण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. येथे येणारा प्रत्येक भाविक श्री साईबाबांच्या श्रद्धेपोटी येत असतो. सर्वांची समन्वयकाची भूमिका असावी याबरोबरच एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या वाक्याचा आधार घेत श्रीमती बानायत यांनी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com