प्राथमिक शिक्षकांना निवडणुकीच्या शासन निर्णयाची प्रतिक्षा

उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू झालेल्या निवडणुकीची स्थिती उठण्याची शक्यता
प्राथमिक शिक्षकांना निवडणुकीच्या शासन निर्णयाची प्रतिक्षा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 24 तारखेला होणार्‍या मतदानाला मागील आठवड्यात सहकार खात्याच्या निर्णयामुळे स्थिती मिळाली होती. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व मंडळाच्या शिक्षक नेत्यांनी थेट मुख्यमंत्र्यापर्यंत संपर्क करत उमेदवारी अर्ज प्रक्रिया झालेल्या निवडणूका सुरू ठेवाव्यात अशी जोरदार मागणी केली आहे. यामुळे नगरच्या शिक्षक बँकेची निवडणुकीची प्रक्रिया सुरू राहणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, सोमवारी दिवसभर जिल्ह्यातील शिक्षकांना निवडणुकीवरील स्थगिती उठवल्याच्या शासन आदेशाची प्रतिक्षा होती.

येत्या 24 तारखेला जिल्हा शिक्षक बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया होणार होती. मात्र, राज्यभरातील पाऊस, अतिवृष्टी, पूर आणि वाहतुकीच्या अडथळ्याचे कारण पुढे करत राज्य सरकारच्या सहकार विभागाने राज्यातील आठ हजार सहकारी संस्था, बँका आणि साखर कारखान्यांच्या निवडणुकांना 30 सप्टेंबरपर्यंत स्थगिती देत त्या पुढे ढकल्या होत्या. यात नगर जिल्हा शिक्षक बँक आणि अकोल्याच्या अगस्ती साखर कारखान्यांचा समावेश होता. अगस्ती कारखान्यांच्या निवडणुकीसाठी काही मंडळीनी थेट औरंगाबाद खंडपीठात धाव घेत मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली.

त्यावर खंडपीठाने या मागणीवर सुनावणीसाठी 25 जुलैची तारीख दिली आहे. दुसरीकडे शनिवारी जिल्ह्यातील शिक्षक नेत्यांनी खंडपीठात याचिका दाखल करण्याची तयारी पूर्ण केली. मात्र, अगस्ती कारखान्यांप्रमाणे खंडपीठाने निर्णय दिल्यास अडचण होईल, यामुळे न्यायालयाऐवजी राज्य सरकार पातळीवर बँकेच्या निवडणुकीसाठी पाठ पुरावा केला. सोमवार (दि.18) शिक्षक नेत्यांनी मुंबई गाठात काही आमदारांच्या मार्फत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात विषय नेला आहे. त्यावर शिक्षक नेत्यांना सोमवारी सायंकाळपर्यंत स्थगिती उठवण्याचे आदेश काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यामुळे निवडणुकीतील चारही मंडळ आणि सभासद असणार्‍या प्राथमिक शिक्षकांना निवडणूक स्थगितीची प्रतिक्षा होती.

सोमवारी राष्ट्रपती निवडणुकीमुळे मुख्यमंत्र्यासह सर्व पक्षाचे आमदार हे गडबडीत होते. यामुळे सोमवारी शिक्षक बँक निवडणूक स्थगिती उठवण्याचा आदेश न आल्यास हा आदेश आज (मंगळीवारी होण्याची शक्य व्यक्त करण्यात येत होती. आधी करोनामुुळे दीड वर्षे लांबेल्या शिक्षक बँकेच्या निवडणुकीची जिल्ह्यातील शिक्षकांना प्रतिक्षा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com