जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या 819 जागा रिक्त

जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या 819 जागा रिक्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. बदली पात्र, बदली अधिकारी प्राप्त आणि अवघड क्षेत्रातील शिक्षकांची माहिती संकलित झाली असून बुधवारी नगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील रिक्त जागांचा तपशील ग्रामविकास विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवर भरला आहे. यात नगर जिल्ह्यात शिक्षकांच्या 819 जागा रिक्त असल्याची माहिती टाकण्यात आली आहे.

दरम्यान, येत्या दोन दिवसांत बदलीमधील पात्र असणार्‍या संवर्ग एकच्या प्राथमिक शिक्षकांना बदलीसाठी त्यांची माहिती ऑनलाईन भरता येणार आहे. मात्र, ही माहिती भरत असतांना त्यांना केवळ बदली पात्र असणार्‍या शिक्षकांच्या जागा दिसणार आहेत. दुसरीकडे संवर्ग दोनमध्ये बदलीसाठी पात्र असणार्‍या शिक्षकांना रिक्त जागा आणि बदली पात्र शिक्षक या दोन प्रकारांतील शिक्षकांच्या जागा दिसणार आहेत.

या प्रकारात पती-पत्नी एकत्रिकरण असणार्‍या शिक्षकांचा समावेश आहे. संवर्ग तीनमधील शिक्षकांना पुन्हा संवर्ग एक प्रकारे बदलीपात्र शिक्षकांच्या जागा दिसणार असून या संवर्गात अवघड क्षेत्रात तीन वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षकांचा समावेश आहे. संवर्ग चारमधील शिक्षकांना संवर्ग दोन प्रमाणे रिक्त जागा आणि बदली पात्र शिक्षक या दोनही प्रकारातील जागा दिसणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com