प्राथमिक शाळा सुरू झाल्यानंतरच शिक्षकांच्या बदल्या

ग्रामविकास विभागाचे राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश
प्राथमिक शाळा सुरू झाल्यानंतरच 
शिक्षकांच्या बदल्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील (State) करोनाची परिस्थिती अद्याप अटोक्यात आलेली नाही (Corona condition is not yet under control). यामुळे प्राथमिक शाळा (primary schools) प्रत्यक्षात सुरू होवू शकलेल्या नाहीत. त्यात करोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेची चर्चा (Discussion of a possible third wave of corona) असून यामुळे प्राथमिक शाळा (primary schools) प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात (State primary schools teachers Transfer) विचार करण्यात येणार असल्याचे आदेश राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने (Rural Development Department of the State Government) राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी (ZP CEO) अधिकारी काढले आहेत.

ग्रामविकास विभागाचे उपसचिव विजय चांदेकर (Deputy Secretary of Rural Development Vijay Chandekar) यांनी याबाबतचे आदेश नुकतेच काढलेले आहेत. या आदेशात ग्रामविकास विभागाच्या वर्ग 3 आणि वर्ग 4 कर्मचार्‍यांच्या बदल्या या 14 मे 2014 च्या शासन निर्णयानूसार, राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 9 जुलै 2012 च्या शासन निर्णयानूसार दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यास करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या 29 जुलै 2021 शासन निर्णयानूसार करण्यात आल्या.

दुसरीकडे राज्यातील करोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे प्राथमिक शाळा सुरू होवू शकलेल्या नाहीत. यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा निर्णय हा शाळा सुरू झाल्यानंतर घेण्यात येईल, असे कळविले आहे. यामुळे सलग दुसर्‍या वर्षी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांवर टांगती तलावार राहणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com