रेडीमेड कपड्यांनाही दरवाढीची झळ !

40 टक्के उत्पादन घटले । 25 टक्क्यांपर्यंत भाव वाढले
रेडीमेड कपड्यांनाही दरवाढीची झळ !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दिवाळी सणावर (Diwali Festival) करोनाचे सावट अद्याप आहे. प्रादूर्भाव कधी उद्भवेल हे सांगता येत नाही. या कारणाने तयार कपडे उत्पादक कारखानदारांनी (Clothing Manufacturers) गेली दोन वर्षापासून उत्पादन 40 ते 50 टक्के कमी केले आहे. आणि 15 ते 25 टक्क्यांपर्यंत दरवाढ केली आहे, अशी माहिती बाजारातील जाणकार व्यापार्‍यांनी (Traders) दिली.

दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी कपडे खरेदी (Buy Clothes) हमखास केली जाते. मात्र दीड वर्षापासून करोना संक्रमणामुळे सण साजरे करण्याचा आनंदही झाकोळला गेला आहे. यंदाच्या दिवाळीवरही लॉकडाऊनचे (Lockdown) संकट होते. मात्र करोना रूग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला. त्यामुळे सरकारने लॉकडाऊन हटवून दिवाळी उत्साहात साजरा करण्याची संधी जनतेला दिली. त्यानंतर बाजारातील (Market) उत्साह पूर्ववत होण्याची प्रतीक्षा आहे. दिवाळी तोंडावर असल्याने खरेदीसाठी ग्राहकांची पावले बाजाराकडे वळतील, अशी अपेक्षा विक्रेते ठेवून आहेत.

दिवाळीसाठी कपडे खरेदी करताना अनेकांचा भर रेडिमेड कपड्यांवर असतो. मात्र करोना संकट आणि वाढलेली महागाईची झळ रेडिमेड कपड्यांनाही बसली आहे. याबाबत लहान मुलांचे रेडिमेड कपडे विक्रेते कन्हैया होजिअरीचे राजू मेवाणी यांनी ‘नगर टाईम्स’ला बाजारातील उलाढालीची माहिती दिली. ते म्हणाले, तयार कपडे उत्पादन हे मुंबई, उल्हासनगर, लुधियाना आदी भागातून मोठ्या प्रमाणात होते. दसरा-दिवाळीकरिता एक महिना अगोदर उत्पादन करून कारखानदार व्यापार्‍यांना माल पुरवठा करतात.

यावर्षी रेडिमेड कपडे उत्पादकांनी (Readymade Garment Manufacturers) आपला माल तब्बल 95 टक्के उधारीवर पुरवठा केला आहे. उधारीवर माल मिळाल्याने बाजारात तयार कपड्यांची आवक चांगली झाली आहे. मात्र करोनाच्या भितीने बाजारपेठेत (Market) अद्यापही ग्राहक कमी प्रमाणात आहे. परंतू दिवाळी झाल्यानंतर ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडतील, अशी आशा आहे.

दिवाळीसाठी लहान मुलांच्या कपडे खरेदीसाठी मोठी गर्दी दरवर्षी होत असते. दोन वर्षापासून व्यापारी वर्ग हतबल झाला आहे. यंदाही दिवाळी सण चार दिवसांवर आला आहे. मात्र ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद नाही. सरकारचे टॅक्स, बँकेचे कर्ज आदी खर्चाने व्यापारी त्रस्त आहेत. व्यापार पूर्ववत होईल आणि लवकर या संकटातून बाहेर पडण्याची आशा आहे.

- राजू मेवाणी, रेडिमेड कपडे व्यापारी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com