डेंग्यू टाळण्यासाठी कोरडा दिवस पाळा

डेंग्यू टाळण्यासाठी कोरडा दिवस पाळा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

डेंग्यु (Dengue) हा विषाणुमुळे होणारा संसर्गजन्य आजार (Infectious Diseases) आहे. डेंग्यु तापाचा प्रसार हा स्वच्छ पाण्याच्या साठ्यामध्ये (Clean water Reservoirs) उत्पत्ती होणार्‍या एडिस डासापासून होतो. यासाठी आठवडयातील एक दिवस संपूर्ण कोरडा दिवस पाळण्यात यावा. घरातील पाणीसाठयाच्या टाक्या, फ्रिज, कुलर, कुंडया आदींमधील पाणी दर 7 दिवसांनी बदलावे, घराभोवती पाणी साठणार्‍या टाकाऊ वस्तू, पत्र्याचे डबे, नारळाच्या करवंटया, रिकामे टायर्स, रिकामे शहाळे, फुटक्या बाटल्या, खड्डे इ. डासोत्पत्ती स्थाने त्वरीत नष्ट करावीत असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके यांनी केले आहे.

अचानक येणारा तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, सांधेदुखी, अंगदुखी आदीसह तोंडाची चव जाणे, मळमळ व उलटया होणे. शरीरावर लाल पुरळ येणे, हिरडयातून व नाकातून रक्तस्त्राव होणे अशी लक्षणे असून वाढती डासोत्पत्ती स्थाने, एडिस डासांची वाढती घनता, परंपरागत पाणी साठयाची सवय व पध्दती, स्व्च्छतेचा अभाव, वाढती लोकसंख्या व राहणीमान, दूषित रुग्णांचे स्थलांतर, डासांच्या किटकनाशक प्रतिकार (Pesticide Resistance of Mosquitoes) शक्तीत वाढ असे त्याचे वाढीचे कारणे आहेत.

डासोत्पत्ती स्थानांवर नियंत्रण राखण्यासाठी डासोत्पत्ती स्थानांमध्ये डास अळी भक्षक गप्पी मासे सोडावेत. यासाठी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) डासअळी भक्षक गप्पी मासे मोफत उपलब्ध आहेत. डासांपासून व्यक्तिगत संरक्षणासाठी नागरिकांनी पूर्ण बाहयाचे कपडे, डास प्रतिबंधक अगरबत्ती, मलम, तसेच मच्छरदाणीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com