अवकाळी पावसाची हजेरी

अवकाळी पावसाची हजेरी

श्रीरामपूर/अहमदनगर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहर व तालुक्यासह राहुरी, नेवासा, कोपरगाव, नगर तालुक्यात काल सायंकाळी काही ठिकाणी विजांच्या कडकडाट व वादळासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

अचानक आलेल्या या पावसाने शेतकर्‍यांची तारांबळ उडाली. श्रीरामपूर तालुक्यात काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ढग दाटून आले. सायंकाळी अचानक वादळी वारा सुरू झाल्यानंतर विजांचा कडकडाट होवून 15 ते 20 मिनिटे चांगला पाऊस झाला. वार्‍यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता. ग्रामीण भागात शेतकर्‍यांचा कांदा उघड्यावर होता, तो झाकण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ झाली.

राहुरी तालुक्यातील वांबोरी, उंबरे, टाकळीमिया, देवळाली, राहुरी फॅक्टरी, आरडगाव, मुसळवाडी परिसरात रात्री 8 ते 9 च्या दरम्यान वादळासह हलका पाऊस झाला. सुरूवातीला आकाशात ढगांचा गडगडात होता. मात्र, रात्री आठनंतर वारा सुटला आणि ढगाचा गडगडाट झाला. त्यानंतर काही वेळ रिमझिम पाऊस आणि वादळ होते. कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी, पोहेगाव, नेवासा तालुक्याततील कुकाणा आदी परिसरातही पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त होते.

नगर शहरातही हजेरी

नगर शहर, उपनगरात पावसामुळे हजेरी लावल्याने वातावारणातील उष्मा कमी झाला. शुक्रवारी दिवसभर कमालाची उकाडा जाणवत होता. हल3या सरी कोसळल्याने नगर शहरातील उपनगरासह ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू होता. अनेक ठिकाणी वीज गायब झाल्याने नागरिकांचे हाल झाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com