वाहन चालकांना लुटण्यापूर्वी दोघांच्या हाती बेड्या

पोलिसांची 'या' घाटात कारवाई
वाहन चालकांना लुटण्यापूर्वी दोघांच्या हाती बेड्या

अहमदनगर|Ahmedagar

इमामपूरच्या घाटात (Ghats of Imampur) वाहन चालकांना लुटण्याच्या तयारीत (Preparing to Robbery Motorists) असलेल्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) जेरबंद केले आहे. भिमा अभिमान गिरे (वय 28), ज्ञानेश्‍वर छगन गिरे (वय 32 दोघे रा. राघुहिवरे ता. पाथर्डी) अशी जेरबंद (Arrested) केलेल्या लुटारूंची नावे आहेत. त्यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल (Filed a Crime) केला आहे. पोलीस नाईक गणेश कावरे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीकडून एक तलवार जप्त (Seized) करण्यात आली आहे.

इमामपूरच्या घाटात दोघे जण शस्त्रासह वाहन चालकांना लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती रविवारी रात्री साडेआठ वाजता सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे (Assistant Inspector of Police Yuvraj Athare) यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार निरीक्षक आठरे यांनी पोलीस उपनिरीक्षक विनोद जाधोर, पोलीस अंमलदार रमेश थोरवे, महमंद शेख, दीपक गांगुर्डे, गणेश कावरे, संदीप आव्हाड यांचे पथक स्थापन करून आरोपींना जेरबंद करण्याच्या सुचना केल्या.

उपनिरीक्षक जाधोर यांच्या पथकाने इमामपूर घाटात जावून दोन्ही लुटारूंना ताब्यात घेत पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे तलवार (Sword) आढळून आली. पोलिसांनी तलवार ताब्यात घेत दोघांना अटक (Arrested) केली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil), अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com