दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळी कर्जत पोलिसांनी पकडली

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळी कर्जत पोलिसांनी पकडली

कर्जत |वार्ताहर|Karjat

सोमवारी (दि. 22) 2 वाजता फोनद्वारे माहिती मिळाली की पाटेगाव आणि पाटेवाडी शिवारात काही इसम

संशयास्पदरित्या असून ते नगर-सोलापूर महामार्गावर 4 ते 5 इसम रस्त्यावर येवून गाडी अडवित आहेत. यानंतर रात्रगस्त अधिकारी पी. एस. आय. अमार्जित मोरे, पोलीस जवान सरोदे, सुपेकर चालक बेग हे त्या घटना स्थळी पोहचले असता चोरट्यांनी तिथून पळून जाऊ लागले असता गस्त पथक आणि स्थानिक नागरीक यांचे मदतीने पाठलाग करून शाहूराज बाबासाहेब कोकरे (वय 21, रा. घाट पिंपरी, ता. आष्टी), योगेश गोयेकर, (वय अंदाजे 27, रा. गोयेकरवाडी, ता. कर्जत), आकाश कोपनर, (रा. काळेवाडी-राशीन, ता. कर्जत), शहाजी शिरगिरे (वय 24, रा. जामवाडी, ता. जामखेड), बाळू, पूर्ण नाव पत्ता माहिती नाही यांना पकडले असून त्यांच्याकडे एक सुरा, मोबाईल आणि चोरीची पल्सर कंपनीची दुचाकी (एम.एच. 12 आर.ई. 1474) मोटारसायकल जप्त केली आहे.

यामध्ये फरार योगेश गोयेकर याच्यावर दरोड्याचा जबरी चोरीचे, चोरीचा असे 4 गुन्हे पूर्वीच दाखल आहेत. तर अटक आरोपी दौड येथील गुन्ह्यात होता फरार. इंदापूर पोलीस ठाण्याचा जबरी चोरीचा 1 गुन्हा उघड झाला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com