दरोड्याच्या तयारीतील दोन आरोपी जेरबंद

तीन जण पसार
दरोड्याच्या तयारीतील दोन आरोपी जेरबंद
जेरबंद

लोणी |वार्ताहर| Loni

लोणी खुर्द गावातील तळेगाव रस्त्यावर बुधवारी पहाटे दरोड्याचा तयारीत असलेल्या दोघांना पकडण्यात लोणी पोलिसांना यश आले, मात्र त्यांचे तीन साथीदार पसार झाले.

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द- तळेगाव रस्त्यावर स्मशान भूमी जवळ अज्ञात पाच जण दारोड्याच्या तयारीत असल्याची माहिती लोणी पोलिसांना बुधवार(दि.19) पहाटे चारच्या सुमारास मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सोमनाथ शंकर कलवर वय 29 रा.रांजणगाव ता.राहाता,मंथन कैलास निकाळे, वय 20 रा.आंबेडकर नगर, राहाता.या दोघांना पकडले.

मात्र त्यांचे तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. आरोपींकडे कटावनी, कोयता, स्क्रू ड्रायवर,बॅटरी,मिरची पावडर या वस्तू मिळून आल्या. पसार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. सोमनाथ कलवर हा सराईत गुन्हेगार असून राहात्यात त्याच्या विरुद्ध अकरा गुन्हे तर मंथन निकाळे याचे विरुद्ध दोन गुन्हे दाखल आहेत. स.पो.नि. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com